लाल महाल – पुणे

0
7221
Lal Mahal Pune

पुणे शहरात अनेक ऐहतासिक वास्तु आहेत. त्यातील लाल महाल हा पुण्याच्या मध्यभागी अतिशय दिमाखाने उभा आहे. तो पुणे शहराच्या कसबा पेठ या परिसरात असून जवळच शनिवार वाडा आणि कसबा गणपतीचे मंदिर आहे. लाल महालाच्या समोर पुणे शहराची शोभा वाढवणारा लक्ष्मी रस्ता आहे.

लाल महालात शिवाजी महाराजांचे वास्तव्य बराच काळ होते. शिवरायांचे बालपण लाल महालात होते. याच महालात शिवरायांनी शाहिस्ते खानाची बोटे कापली होती. हा शाहिस्तेखान तिन वर्ष लाल महालात तळ ठोकुन पुण्यातील जनतेला त्रस्त करत होता. म्हणून महारांजानी त्यास धडा शिकवण्यासाठी आपल्या ४०० विश्वासू मावळ्यांसहित लाल महालावर स्वारी करुन शाहिस्तेखानास लाल महाल सोडण्यास भाग पाडले.

पुण्यातील लाल महाल हा प्रत्येक शिवप्रेमीसाठी अत्यंत आभिमानाची वास्तू आहे. सध्या लाल महाल हा नावासाठीच राहीला आहे. कारण मुळ लाल महालाची वास्तू अस्तित्व नाही.सध्याची वास्तू पुणे महानगर पालिकेने २९८८ साली उभारलेली आहे.