75 वर्षांच्या आजीबाईंनी सर केला #हरिश्चंद्रगड

0
229
Harishchndra gad
Harishchndra gad

७५ वर्षांच्या हिराबाई दत्तात्रेय शिंदे यांनी शनिवारी एका दिवसात हरिश्‍चंद्र गड सर केला. तरुणांनाही लाजवेल असा आजीचा ऊसाह होता. आजीचे वय जरी ७५ असले तरी त्याचा ऊसाह मात्र तरुणांसारखा होता. हरिश्‍चंद्र गड हा साधासुधा गड नसून महाराष्ट्रातील सर्वात उंच गड म्हणून हरिश्चंद्राचा तिसरा क्रमांक लागतो.

हरिश्चंद्रगड हा पुणे , ठाणे आणि नगर जिल्ह्यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्र डोंगर आहे. येठील शिखर पुणे जिल्यातील सर्वात उंच शिखर आहे. हरिशचंद्र गडाची उंची ४००० फूट असून तो गड आजीने एका दिवसात सर केला हि सर्वात मोठी गोस्ट .

त्याचा नातू निखिल प्रमोद बारभाई  हा अनेक वेळा गड-किल्ले फिरायला जातो त्यामुळे त्यानीही हरिश्चंद्रगड सर करण्याची इच्छा व्यक्त केली त्यानुसार दोघे शनिवारी हरिश्‍चंद्र गड सर करण्यासाठी निघाले व एकाच दिवशी कोकणकडा, मंदिर व तारामती शिखर सर केले. दरम्यान, शेवटच्या टप्प्यात घळईमार्गे गड उतरत असताना अंधार झाल्यामुळे त्यांना मार्ग सापडत नव्हता. त्यामुळे निखिल यांनी आपल्या मित्रांना मदतीसाठी बोलावले व सुखरूप गडाच्या पायथ्यशी आले.

आजीबाईने तारामती शिखर सर केल्याने तेथील रहिवासी अचंबित झालेले दिसले. कारण, हरिश्‍चंद्र गड सर करण्यासाठी खूप तरुण येत असतात, परंतु कोणी सहजासहजी तारामती शिखराकडे जात नाहीत. त्यामुळे सर्वांनी आजीबाईंचा सत्कार केला व त्यांच्या धैर्याचे कौतुक केले.

Comments

comments