या आठ कारणांमुळे झाला भारताचा पराभव

0
1559

 

या आठ कारणांमुळे झाला भारताचा पराभव !

 

Ind vs Pak
Ind vs Pak

1) चुकलेला निर्णय भारत टॉस जिंकला होता .तेव्हा भारतानं गोलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानला मोठे आव्हान देऊन भारताला या मॅचमध्ये जिंकता आलं असतं, कुठलेही दडपण न घेता फलंदाजी करता आली असती.

Ind vs Pak
Ind vs Pak

2) बुमराह चा नो बॉल बुमराहच्या नो बॉलनं खूप मोठी भरपाई भारताला द्यावी लागली. फखर धोणीच्या हाती कॅच आऊट झाला होता. पण तो नोबाॅल ठरला.

Ind vs Pak
Ind vs Pak

3) सुमार बॉलिंग आज संपूर्ण सिरीजमधली सगळ्यात सुमार बॉलिंग भारतीय गोलंदाजांकडून पाहायला मिळाली. अश्विन आणि जडेजानं अत्यंत खराब प्रदर्शन केलं.भारतीय गोलंदाजांना पाकिस्तानी फलंदाजांना रोखण्यात अपयश आलं.विशेष करून फखऱ आणि मुहम्मद हफीस या दोन फलंदाजांना रोखलं गेलं असतं तर कदाचित धावांचा इतका मोठा डोंगर पाकिस्तानला उभा करता आला नसता.

Ind vs PakInd vs Pak

4)पाकिस्तानची सुरेख फलंदाजी भारतीय गोलंदाजांची बॉलिंग तर खराब होतीच .पण त्यासोबत पाकिस्तानच्या फलंदाजांनी अत्यंत संयमित फलंदाजीचा उत्कृष्ट नमुना दिला. फार घाई न करता आणि जास्त चुका न करता पाकिस्तानी फलंदाजांनी धावांची दोरी 300 च्या पुढे खेचली. अझगर अली आणि फकर यांच्या 128 धावांच्या भागीदारीने पाकिस्तानी फलंदाजांना उभारी दिली .तसंच शेवटच्या 10 षटकांमध्ये 240ते 340 हा पल्ला गाठाण्यात मुहम्मद हफीजचा मोठा वाटा होता.

Ind vs Pak
Ind vs Pak

5) भारताचे सुमार क्षेत्ररक्षण भारताच्या बॉलिंग लाईन इतकीच भारताचे क्षेत्ररक्षण ही या पराभवाचं प्रमुख कारण होतं. भारतीय क्षेत्ररक्षकांनी काही महत्वाचे कॅचेस हुकवले. तसेच काही चौकार थांबवण्यात भारताला अपयश आलं

Ind vs Pak
Ind vs Pak

6) मोहम्मद आमिर आणि हसन अलींची शानदार बॉलिंग आज आमिरनं भारतीय फलंदाजांना 22 यार्डात स्थिरच होऊ दिलं नाही. पहिल्याच षटकात रोहितची विकेट घेऊन त्यानं भारतावर दबाव निर्माण केला. विराट,रोहित आणि शिखऱ यांचे बळी घेत त्यानं भारतीय बॅटिंग आॅर्डरच कंबरडच मोडलं आणि या पठ्यानं फक्त 16 धावा दिल्या . तसंच हसन अलीनं ही 19 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. या दोघांच्या उत्कृष्ट गोलंदाजीनं भारताचं आव्हान संपुष्टात आणलं.

Ind vs Pak
Ind vs Pak

7) भारताच्या फलंदाजांनी केलेली निराशा भारताच्या फलंदाजांना एवढा मोठा डोंगर पार करण्यासाठी एका मोठ्या भागीदारीची गरज होती. पण भारतीय फलंदाज ही लंब्या पारीची भागीदारी तयार करूच शकले नाहीत. धोनी आणि युवराज सारख्या अनुभवी फलंदाजांना ही आज अशी भागीदारी खेळण्यात मोठं अपयश आलं.हे पराभवाच एक महत्वाचं कारण ठरलं.

Ind vs Pak
Ind vs Pak

8) हार्दिक पांड्या रन आउट होणे भारताची बुडती नावं किनाऱ्यापर्यंत आणण्याचा शेवटचा प्रयत्न पांड्यानं केला. त्याच्या अर्धशतकी खेळीनं भारताच्या आशा पल्लवीत केल्या. पण रवींद्र जडेजाने रन घेण्यासाठी काॅल घेतला खरा पण तो पुढे धावलाच नाही. तो तसाच माघारी परतला. त्याच्या माघारी परतल्यामुळे पांड्याचा नाहक बळी गेला. त्याच्या रन आउट होण्यानं साऱ्याच आशा मावळल्या. जर पांड्या आऊट झाला नसता तर मॅच चित्र नक्की वेगळं असतं. आता पुढच्या काळात फलंदाजी,गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर भारताला काम करावं लागणार आहे.

 

LEAVE A REPLY