शेतकऱ्यांनो हे बोगस बियाणे घेऊ नका

2
2289
Farmer
Farmer

शेतकऱ्यानो आता चूकिला माफी देऊ नका तक्रार दाखल करा बोगस बियाणे घेऊ नका

कृषी विभागाने राज्यात प्रथमच खरीप हंगामापूर्वी कापसाच्या वाणांच्या तपासणीची मोहीम राबविली. त्यामध्ये १७ कंपन्यांचे २५ वाण सदोष आढळून आले असून, त्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच कंपन्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. आतापर्यंत कृषी विभागाकडून खरीप हंगाम संपल्यानंतर साधारणतः डिसेंबर महिन्यात कापसाच्या वाणांची तपासणी करण्यात येत होती. मात्र, तोपर्यंत शेतकऱ्यांनी संबंधित सदोष वाण वापरल्यामुळे त्यांचे नुकसान होत असे. त्यामुळे यंदा हंगामापूर्वीच वाण तपासणीची मोहीम राज्यभर राबविण्यात आली. त्यामध्ये १७ कंपन्यांचे २५ वाण सदोष असल्याचे आढळले.

Maharashtra.
Maharashtra.

सदोष वाणांमध्ये ‘कीर्तीमान सीड’ या कंपनीचे चार वाण आहेत. या शिवाय ‘कावेरी सीड’ कंपनीचे तीन, श्रीराम बायोजेनेटिक्स, कृषिधन प्रायव्हेट लिमिटेड, सोलर अॅग्रोटेक यांच्या प्रत्येकी दोन वाणांचा समावेश आहे. याशिवाय तुलसी सीड, श्रीसत्य अॅग्री बायोटेक, विभा अॅग्रोटेक, नाथ बायोजीन, अजित सीड, श्रीराम अॅग्रो जेनेटिक्स, झायलेम सीड, नुजीवुडू सीड, सफल सीड, बायर बायो सायन्स, अंकुर सीड आणि सनग्रो या कंपन्याचे प्रत्येकी एक सदोष असल्याचे आढळले आहे.

Farmers
Farmers

सदोष वाणांमुळे गेल्या वर्षी अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. जालन्यातील २२३ शेतकऱ्यांना सुमारे ३६ लाख ८३ हजार रुपयांची नुकसानभरपाई द्यावी लागली होती. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने राज्यभर विविध वाणांची तपासणी केली. त्यामध्ये २५ वाण सदोष आढळून आले. संबंधित कंपन्यांना नोटिसा पाठविण्यात आल्या असून, पुढील कारवाई केली जाणार असल्याचे कृषी विभागाने नमूद केले.

कंपनी आणि बंदी घातलेले वाण शेतकऱ्यानो खालचे बियाणे विकत घेऊ नका जो दूकानदार बियाणे विकत आसतील तर कृषी कार्यालयाकडे तक्रार करा

Farmer seed
Farmer seed

तुलसी सीड – तुलसी ११८, श्रीसत्य अॅग्री बायोटेक – एसएससीएच ५५५ विभा अॅग्रोटेक – व्हीबीसीएच १५३३, नाथ बायोजीन – ड्रोन एनबीसी ११, अजित सीड – अजित १९९, श्रीराम अॅग्रो जेनेटिक्स – एसआरसीएच ४०२, कावेरी सीड – जाडू केसीएच १४ के ५९, केसीएच १८९ कॉट बँक, एटीएम केसीएच ३११, श्रीराम बायोजेनेटिक्स – एव्हरेस्ट ३११ – २, केडीसीएचएच ६४१ कृषिधन प्रायव्हेट लिमिटेड – केएसएल १०३१, केडीसीएचएच ६४७, झायलेम सीड – ७३ सी ५२, नुजीवुडू सीड – एनसीएच ९५४, सफल सीड – एसएसबी ९८, बायर बायो सायन्स – फस्ट क्लास एसपी ७१४९, अंकुर सीड – ३२४४, सनग्रो – व्हीआयसीएच ५, सोलर अॅग्रोटेक – सोलर ६६, सोलर ६०, कीर्तीमान सीड – केसीएचएच ९३२, केसीएचएच ८१५२, केसीएचएच ९०४, सरिता १०८

या बंदी घातलेले वाण कृषी दूकानदार विक्री करत आसेल* *तर कृषी आयूक्त मा, सुनिलराव केंद्रेकर यांच्या कार्यालयाकडे संपर्क साधा

कृषि आयुक्तालय, म.रा. तिसरा मजला,                                                                                               मध्यवर्ती प्रशासकीय् इमारत, पुणे ४११००१,                                                                                     दूरध्वनी – (०२०)२६१२३६४८,                                                                                                     फॅक्स – (०२०)२६१२७७०७,                                                                                                         इमेल – comagri.pune@agri.maharashtra.gov.in                                                                    Website – http://www.mahaagri.gov.in

2 COMMENTS

  1. Increase Likes, autoliker, autolike, auto like, ZFN Liker, auto liker, Auto Liker, Photo Auto Liker, Working Auto Liker, Autolike International, Status Auto Liker, Photo Liker, Status Liker, Autoliker, Autoliker, Auto Like, Autolike

LEAVE A REPLY