कौतुकास्पद ! नमाज अदा करणाऱ्या सहकाऱ्याला हिंदू जवानाचा कडेकोट पहारा…!!

कौतुकास्पद ! नमाज अदा करणाऱ्या सहकाऱ्याला हिंदू जवानाचा कडेकोट पहारा…!!

0
2518

सोशल मीडियावर हा फोटो का होतोय व्हायरल

crpf
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमुळे पुन्हा विश्वास वाढतो की समाजात सहिष्णुता आणि मानवता कायम आहे. हा फोटो आहे श्रीनगरमधील सेक्टर सीआरपीएफने पोस्ट केलेला. यामध्ये देशाची सेवा करणाऱ्या दोन धर्माच्या जवानांची आहे.

 

या फोटोत असं दाखवण्यात आलं आहे की, एक जवान रस्त्याच्या शेजारी रूमाल हंथरून नमाज अदा करत आहे. तर दुसरा जवान त्याच ठिकाणी बंदूक घेऊन त्याचं रक्षण करत आहे. आणि आपली ड्यूटी पूर्ण करत आहे. हा फोटो खऱ्या अर्थाने बोलका आहे. एक फोटो खरी सत्य कथा मांडतो असं म्हणतात. ते वावगं ठरणार नाही.

मात्र या फोटोवर अशी देखील कमेंट येऊ शकते की जवानला जर नमाज अदा करायचा असेल तर रस्त्यावर नमाज पडण्याची गरज काय आहे? त्यामुळे या फोटोवरून खूप चर्चा रंगली आहे. शांतीसाठी सशस्त्र बंधूत्व’ (Brothers-in-arms for peace) अशा कॅप्शनसह हा फोटो सीआरपीएफच्या ऑफिशिअल ट्विटर अकाऊण्टवर शेअर करण्यात आला आहे. ऑन ड्युटी असताना नमाज अदा करणाऱ्या
मुस्लिम अधिकाऱ्याच्या रक्षणार्थ दुसरा ऑफिसर उभा आहे.

काश्मिरचं खोरं धार्मिकतेच्या नावाखाली सतत धगधगतं राहिलं आहे. त्यातच सीआरपीएफच्या जवानांचा हा अनोखा बंधुत्ववाद सोशल मीडियावर अनेकांच्या मनाला स्पर्शून गेला आहे