दाऊदच्या भावाला अटक करणाऱ्या या अधिकाऱ्याने केले तब्बल 113 एन्काऊंटर….!!

0
2885

अब तक 113 एन्काऊंटर

प्रदीप शर्मा यांचा जन्म उत्तर प्रदेशच्या आग्रामध्ये झाला होता. त्यांचे वडील महाराष्ट्रातील धुळ्यात हिंदी मीडियम शाळेचे मुख्याध्यापक होते. त्यांनी एमएससीपर्यंतचं शिक्षण धुळ्यातूनच पूर्ण केलं. यानंतर त्यांनी महाराष्ट्र पोलिस दलाची परीक्षा दिली. पास झाल्यानंतर त्यांची महाराष्ट्र पोलिसात निवड झाली.

Pradip Sharma Images - Being Marathi
Pradip Sharma Images – Being Marathi

एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेल्या प्रदीप शर्मा 1983 मध्ये पोलिस उपनिरीक्षक म्हणून मुंबई पोलिसात रुजू झाले होते. २६/११ हल्ल्यातील शाहिद विजय साळसकर त्यांचे बॅचमेट होते.

 

माहिम पोलिस स्टेशनमध्ये त्यांनी नोकरीची सुरुवात केली. यानंतर काही वर्षांसाठी त्यांची बदली स्पेशल ब्रांचमध्ये झाली होती.

प्रदीप शर्मा यांच्याकडे घाटकोपर आणि जुहू पोलिस स्टेशनचाही चार्ज होता.असं म्हटलं जातं की, त्यावेळी घाटकोपर पोलिस स्टेशनचा चार्ज घेण्यास कोणीही सहसा तयार होत नसे. पण प्रदीप शर्मा यांनी चार्ज घेतल्यानंतर गुन्हेगारांनी त्या परिसरापासून दूर राहणंच पसंत केलं.

Pradip Sharma - BM
Pradip Sharma – BM

त्यांनी आपल्या करिअरमधील पाहिले एन्काऊंटर ६ मे १९९३ साली सुभाष मकडवला याचे केले. या वेळी त्यांच्या सोबत विजय साळसकर देखील होते. हे दोघेही तेव्हा पोलिस उपनिरीक्षक होते.

क्राईम इंटेलिजन्स युनिटमध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक असलेल्या प्रदीप शर्मा यांनी कुख्यात गँगस्टर विनोद मातकरचा एन्काऊंटर केल्यानंतर ते एन्काऊंटर स्पेशलिस्ट म्हणून प्रसिद्ध झाले.

विनोद मातकरशिवाय प्रदीप शर्मा यांनी परवेझ सिद्दीकी, रफीक डब्बावाला, सादिक कालिया या गुन्हेगारांचा एन्काऊंटर केला. यानंतर मुंबईला हादरवण्याचा कट रचणाऱ्या लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांचा एन्काऊंटर केला.

Pradip Sharma - Being Marath
Pradip Sharma – Being Marath

प्रदीप शर्मा यांच्या नावावर 100 पेक्षा जास्त (113) एन्काऊंटरची नोंद आहे. ‘अब तक 56’ हा सिनेमात प्रदीप शर्मा यांच्यावर आयुष्यावर बनला होता.

शिक्षकाचा मुलगा असलेल्या प्रदीप शर्मा यांच्या आयुष्यावर ‘रेगे’ नावाचा मराठी चित्रपटही बनला आहे. शर्मा यांनी जवळपास 312 चकमकींमध्ये भाग घेतला होता. त्यांनी शंभरहून अधिक गुंडांचा खात्मा केला आहे. त्यात लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेसह आंतरराष्ट्रीय गुन्हेविश्वातील गुंडांचा समावेश आहे.

अंडरवल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्यासाठी काम करत असल्याचा ठपका ठेवत त्यांना 9 वर्षांपूर्वी निलंबित करण्यात आले होते. नोव्हेंबर 2006 मधील लखनभैया चकमक बनावट असल्याचे तपासात समोर स्पष्ट झाले होते.या प्रकरणात मुंबई पोलीस दलातील 13 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यात प्रदीप शर्मा यांचाही समावेश होते. या प्रकरणी त्यांना 2008 मध्ये पोलीस सेवेतून निलंबित केले होते. त्यानंतर त्यांची या प्रकरणातून निर्दोष सुटका करण्यात आली होती.