तर मी नोकरीला लाथ मारेल.. सोलापूर CEO राजेंद्र भारुड यांची फेसबुक पोस्ट

0
3749
Rajendra Bharude
Rajendra Bharude

…तर मी नोकरीला लाथ मारेल.. सोलापूर CEO राजेंद्र भारुड यांची फेसबुक पोस्ट

काहीही बातमीची चौकशी न करता त्यावर भाष्य करीत जाणे हा आपल्या माणसाचा स्वभाव…अपूर्ण बातमी आणि आपल्या मनाला वाटेल असा अर्थ काढणेमला कोणाला स्पष्टीकरण देणे किंवा मी राजकीय नेता नसल्याने हे देण्याची गरज नाही पण माझ्या सर्व मित्रानां वास्तूस्थिती कळावी , जेणेकरून ब्रेकिंग न्यूज साठी तत्पर असणाऱ्या आणि नकारात्मक भूमिका असणाऱ्या साठी त्यानां उत्तर मिळेल… मागील 4 महिन्यात सोलापूर जिल्ह्यात Record Breaking पूर्ण देशातील सर्वात जास्त 80000 शौचालय बनले आता फक्त 30000 शौचालय बाकी असून जिल्हा ODF declare होणार..

Loading...

Loading...

त्यानुशंगाने जास्त शौचालय असलेल्या गावी जावुन मुक्काम करून व सकाळी 5 वाजता उठून गावात महिला बचत गटांना व गावातील ज्येष्ठ नागरिकांना सोबत घेऊन ज्या घरी शौचालय नाही त्यानां भेट देणे, व निगराणी पथक मार्फत लोकांना उघड्यावर बसण्यापासून प्रवृत्त करणे आता शासनाकडून 12000 रुपये अनुदान देण्यात यात आहे आणि ज्यांचे यादीत नाव नाही त्याला MGNREGA तून अनुदान देण्यात येते फक्त आपण सवयीचे गुलाम असल्याने वारंवार सांगितल्यावर सुद्धा बाहेर शौचास काही लोक जातात,

Loading...
Rajendra Bharud - Being Marathi
Rajendra Bharud – Being Marathi

आता फोटो बद्दल मी स्वतः कधीच माझ्या शासकीय कामाचे फोटो काढत नाही कोणाकडे पाठवायचे तर दूरची बाब..जर सोलापुरातील एकाही माणसाने ह्या महिलांचे फोटो मोबाइलने मी पाठविले हे सिद्ध केदे तर मी Voluntary नौकरीला लात मारेल आणि माझा Medical Profession सुरू करेल. .

Loading...
Rajendra Bharud - Being Marathi
Rajendra Bharud – Being Marathi

कारण IAS ही माझी Passion आहे रोजगार किंवा प्रसिद्धी साठी तर मुळीच नाही कारण मला कुठ निवडणूक लढवायची नाही आणि स्वत: अध्यात्माचा साधक असल्याने समाधानी आणि आनंदी आयुष्य कोणालाही चापलूसी न करता फक्त लोक कल्याणासाठी गरीब, दलित, आदिवासी व वचितांसाठी मी काम करतो कारण त्यात स्वामी विवेकानंद आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातून मी प्रेरणा घेऊन काम करत आहे आणि आयुष्यभर वचितांसाठी लढा देत राहणार.आता फोटो बद्द्ल काही गावांतील महिला ह्या बाहेर शौचास जाऊन आल्यावर घरी परतत असताना वाटेत गावातील बचत गटातील महिलांनी त्याना थांबवून प्रबोधन केले व त्याच्याकडून शौचालय बांधण्याचा एका आठवड्यात वचन घेऊन महिलानीं त्याचां सत्कार केला आणि आमच्या सोबत टीम मधील एका माणसाने फोटो काढून माझ्या नकळत ते फोटो कोणत्यातरी पत्रकाराच्या ग्रुप मधे सकारात्मक दृष्टीने पाठविले

Rajendra Bharud - Being Marathi
Rajendra Bharud – Being Marathi

ह्यात माझ काही चुकल हे आपण सागांवे आणि जर माझी चूक नसेल तर ज्या पत्रकाराने कसलीही गावात चौकशी न करता फक्त मी मागासवर्गीय आदिवासी आहे आणि बहुजनांच्या उत्थानासाठी काम करतो म्हणून एका पत्रकाराने माझ्यावर केलेल्या अपमानास्पद बातमी साठी काय कारवाई करावी कृपया Comments लिहा।।
आपला सर्वाचा शुभचिंतक
ड़ाॅ राजेन्द्र भारूड (IAS)

Loading...