‘टायगर जिंदा है’चा ट्रेलर आला!! ​जबरदस्त अ‍ॅक्शन एकदा पहाच तुम्ही पण प्रेमात पडाल.

0
3479

या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बासने केलं असून हा चित्रपट 2017 मध्ये ख्रिसमसला रिलीज होणार आहे. येत्या 22 डिसेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होईल. ‘टायगर जिंदा है’मध्ये पुन्हा एकदा सलमान व कॅटची तिचं शानदार केमिस्ट्री आपण पाहू शकणार आहोत आणि ‘टायगर जिंदा है’चा ट्रेलर याचा पुरावा आहे.

Loading...

Loading...

‘टायगर जिंदा है’च्या ट्रेलरची सुरवात होते ती इराकपासून. ‘जबसे दुनिया बनी है तबसे हर कोने में सिर्फ एकही जंग हुई है सही और गलत की… रोशनी और अंधेरे की…’, हा ट्रेलरमधील पहिलाच डायलॉग मनं जिंकून घेतो. टायगर पुन्हा एकदा आपल्या त्याच अंदाजात परतल्याचे हा ट्रेलर पाहिल्यानंतर जाणवते. बंदी बनवण्यात आलेल्या २५ परिचारिकांना वाचवण्याच्या मिशनवर निघालेला टायगर यात दिसतो. ‘एक था टायगर’ची कथा संपली होती, तिथून ‘टायगर जिंदा है’ची कथा सुरू होते, असे ट्रेलर पाहिल्यानंतर जाणवते. टायगरच्या जबरदस्त अ‍ॅक्शन स्टंटशिवाय या चित्रपटात अनेक नव्या गोष्टी पाहायला मिळतील, याचा अंदाजही ट्रेलर पाहिल्यानंतर येतो. ट्रेलरमध्ये कॅटरिना कैफ ही सुद्धा अ‍ॅक्शन अवतारात दिसलीय. ट्रेलरमध्ये अनेक धोकादायक अ‍ॅक्शन सीन्स करताना तिला दाखवले गेले आहे.

Loading...

एकंदर काय तर, ‘टायगर जिंदा है’चा ट्रेलर पाहिल्यानंतर सलमान पुन्हा त्याच्या खास अंदाजात परतल्याचे स्पष्ट होते. ट्रेलरमधील सलमानचा एक डायलॉग अंगावर शहारे आणतो. ‘शिकार तो सभी करते है लेकिन टाइगर जैसा शिकार कोई नहीं कर सकता है,’ हा तो डायलॉग आहे.

Loading...

सलमानचा ‘एक था टायगर’ हा चित्रपट 15 ऑगस्ट 2012 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 199 कोटी रुपये कमाई केली होती. या चित्रपटात सलमानसोबत कतरीना मुख्य भूमिकेत होती. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खानने केले होते. या चित्रपटात सलमान खानला ‘रॉ’ या गुप्तचर यंत्रणेचा एक एजंट दाखवण्यात आले होते.

त्याचाच पुढचा भाग म्हणून ‘टायगर जिंदा है’ या सिनेमाकडे पाहिलं जात आहे.

Loading...