जे. जे. रुग्णालय सोडल्यावर तात्याराव लहाने यांची भावनीक

0
2971

 जे. जे. रुग्णालय सोडल्यावर तात्याराव लहाने यांची भावनीक

मित्रहो नमस्कार. अधिष्ठाता पदाचा कार्यभार दि. ५ आक्टोबर रोजी सोडला. सहसंचालक पदावर माझी पदोन्नती झाली. दि. ११ फेब्रुवारी २०१० ला मी सर जेजे रूग्णालयाता कार्यभार हाती घेतला होता.७वर्ष व ८ महिने अधिष्ठाता पदावर काम केले. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे शक्य झाले. मीआपणा सर्वांची ऋणी आहे. कार्यभार घेतलेयानंतर

१)सुरूवात रूग्णांचे जेवन सुधारण्यासाठी सर्व प्रयत्न करून त्यात यश मिळवले.

२) बंद आवस्थेत आसणारे आयसीसीयु व एमआयसियु सुरू करण्यात आले.

३). एचएमआयएस चा पायलट प्राजेक्ट सुरू करून सर्व रूग्णांचे नोंदणी तपासण्या व उपचार काॅम्प्युटराज्ड करण्यात आले.

४) सर जेजे रुग्णालय स्वच्छ करण्यासाठी १० जुन २०१० रोजी पहिली स्वच्छता मोहीम घेऊन संपूर्ण रूग्णालय व परिसर स्वच्छ करण्यात आला. ही मोहीम सात्तत्याने दरवर्षी चालु ठेवुन सर जेजे रूग्णालय सर्व रूग्णालयात स्वच्छ रूग्णालय करण्यात यश मिळवले.

५) पंतप्रधान स्वास्थ्य योजने अंतर्गत मिळालेल्या निधीतून २० कोटी रूपयांत ७ मजली प्रशासकीय ईमारतीचे दोन वर्षापासुण रखडलेले बांधकाम सुरू करून ते पुर्ण केले. तसेच १०० कोटीची अर्धवट राहीलेले काम पुर्ण करून सर जेजे रूग्णालयाचा कायापालट केला.

६) महाराष्ट्र शासनातील एमएमआरडीय कडून ४३ कोटी रुपये मिळवून, थ्री टेसला एमआरआय, हायपरबारीक आक्सीजन सारख्या आत्याधुनीक यंत्राची भर टाकली. याचं पैशातुन सेंट जाॅर्जेस रूग्णालचाया कायापालट करण्यात आला.

७) रखडलेले बांधकाम व रिपेअर्स पूर्ण करण्यासाठी सर जेजे समुह रूग्णालयासाठी वेगळे हेड निर्माण करून त्यामार्फत दरवर्षी १० कोटीचे अनुदान मिळवून रूग्णालयातील सर्व ईमारती सुव्यवस्थीत करण्यात आल्या.

८) खेड्यातुन येणाऱ्या रूग्णांच्या नातेवाईकांची सोय व्हावी म्हणून ५०० नातेवाईकांना थांबतां यावे असे सर्व सोयींने परिपूर्ण विश्रामगृह बांधले.

९) सर जेजे रूग्णालयात सोयी सुविधा भर टाकत असताना डाॅक्टर्स व कर्मचाऱ्याना रूगसेवेचे धडे दिल्याने रूग्णसंख्या जी वार्षिक पांच लाखाच्या वर १६५ वर्षात गेली नव्हती ती मागील सात वर्षात रूग्णांचा विस्वास मिळवत
१० लाखावर गेली.

१०) रूग्णालयात होणाऱ्या शस्त्रक्रियाने १६ हजारावुन वाढून ३० हजाराचा पल्ला गाठला.

११) रूग्णालयात आंतररूग्ण असणाऱ्या सरासरी २७ दिवस राहवे लागत असे, त्या सेवा सुधारून आज रूग्णांचा सरासरी स्टे ७ दिवसावर आणण्यात येस मिळवीले.

१२) महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजेने मार्फत महिण्याला सरासरी 1000 रूग्णावर मोफत उपचार करूण हे रूग्णालय महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

१३) एमडी एमएस च्या जागा ज्या ९७ होत्या त्या एमसीआय कडे प्रयत्न करून त्या १७५ वर नेण्यात आल्या आहेत.

१४) वृध्दांची काळजी घेण्यासाठी केंद्रांच्या मदतीने जिऱ्याट्रीक विभाग सुरू करणारे हे महाराष्ट्रातील पहिले रूग्णालय आहे.

१५) एचआयव्ही बाधीत रुग्णांसाठी एकाच रूग्णालयात दुसरे केंद्र मिळवणारे भारतातील पहीले रूग्णालय झाले आहे.


१६) रिजनल अक्रीडेटेड पिसिआर लॅब निर्माण करणारे हे पहीले रूग्णालय आहे.

१७) लेसीक लेसरद्वारे चष्म्याचे नंबर कमी करणारे हे महाराष्ट्रातील पहिले रूग्णालय आहे.

१८) येथे येणारे रूग्ण हे मोठे रूग्णालय म्हणून येत असतात. त्यांची सोय व्हावी म्हणून शासनाकडे पाठपुरावा करून ६३० कोटीचे सुपरस्पेश्यालिटी रूग्णालय मंजुर करून घेण्यात आले.३० मीटरच उंची मिळत असल्याने मोठे रूग्णालय बांधने कठीण होते. शासनाकडे प्रयत्न करून उंची ४५ मीटर करून घेण्यात यश मिळाले. हेरीटेज समितीची परवानगी घेउन पहिल्या फेजचे पाडकाम पुर्ण करण्यात आले. ११०० खाटाचे सर्व सोयींने युक्त सुपरस्पेशालीटीचे हे शासनाचे पहीलेच रूग्णालय असेल.

१९). हे सर्व करत असताना सकाळी नेत्र विभागात जाऊन रूग्ण तपासने व वर्षांला ५००० शस्त्रक्रिया करत असे. सर जेजे रूग्णालयाचा कायापालट झाल्याने भारतातील वर्गवारीत मागे असणारे रूग्णालय आज सात्तत्याने भारतात ५ व्या क्रमांकावर आहे.