मकर संक्रांत आणि तिळाचे महत्व काय ?

0
2118

संक्रांतीमध्ये तिळाचे महत्व

कोणताही उत्सव त्यात काहीतरी व्यंजन प्रामुख्याने बनवलेच जाते आणि खाल्लेही जाते. याला लोक परंपरेशी जोडतात परंतु तुम्ही जणू इच्छिता का कि संक्रातीच्या सणाला तीळ आणि गूळाने बनवलेले पदार्थ का खाल्ले जातात ? जर नाही तर आम्ही तुम्हाला सांगू तीळ आणि गुळाचे या दिवसातील महत्व.

या दिवशी तीळ आणि गूळ का खातात

देशात प्रत्येक सणाला विशेष पकवान बनवून खाण्याची परंपरा आहे. याच शृंखलेत मकर संक्रांतीच्या निमित्याने विशेष रुपात तीळ आणि गुळाचे पदार्थ खाल्ले जातात. काही ठिकाणी तिळाचे लाडू बनवले जातात तर काही ठिकाणी तिळाची चिक्की बनवली जाते. पण संक्रांतीमध्ये तीळ आणि गूळ का खावे यामागेही वैज्ञानिक संशोधन आहे.

Makar Sankranti
Makar Sankranti

हिवाळ्यात जेव्हा शरीराला गर्मीची आवश्यकता असते तेव्हा तीळ आणि गुलामधील प्रथिने यात चांगल्याप्रकारे काम करतात. कारण तीळात तेलाचे प्रमाण जास्त असते. जे खाल्याने शरीराला अधिक प्रमाणात तेल मिळते आणि जे शरीरात उब निर्माण करत. याचप्रमाणे गूळसुद्धा गरम असतो. हिवाळ्यात तीळ आणि गुळाचे पदार्थ शरीराला आवश्यक गर्मी देतात.

Makar Sankranti
Makar Sankranti

हेच कारण आहे की मकर संक्रांतीच्या सणाला तीळ आणि गुळाचे पदार्थ बनवून खाल्ले जातात.

देशातील वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रकारे हा सण साजरा केला जातो.

उत्तर प्रदेश :
येथे मकर संक्रातीला खिचडी सणाच्या रुपात मानले जाते. सूर्याची पूजा केली जाते. डाळ आणि तांदुळाची खिचडी खाली व दान केली जाते.

गुजरात व राजस्थान :
येथे हा सण उत्तरायन पर्व म्हणून मानला जातो. पतंग उत्सवाचे आयोजन केले जाते.

आंध्राप्रदेश :
येथे हा तीन दिवसीय उत्सव म्हणून साजरा होतो.

तामिळनाडू :
येथे हा सण पोंगल म्हणून साजरा होतो.

महाराष्ट्र :
येथे गुळ आणि तिळाचे लाडू बनवून खाल्ले जातात तसेच एकमेकांना भेट वस्तू देवून शुभेच्छाही दिल्या जातात.

पंजाब :
येथे एक दिवासाआधी लोहडी सण साजरा केला जातो.

तिळाचे महत्व :

– तीळ हायब्लड प्रेशरला कंट्रोल करण्यासाठी मदत करतो.

– तसेच अनेक संशोदानात हेही समोर आले आहे की तीळामध्ये असलेलं तेल हाय ब्लड प्रेशरला कमी करत आणि हृदयावर जास्त भर होऊ देत नाही म्हणजेच हृदयाला आजारापासून वाचवण्यासही मदत करतो.

– तीळामध्ये असणारे मॅग्नेशियम डायबीटीज होण्यापासून बचाव करतो.

– शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण व्यवस्थित ठेवण्याचे काम तीळ करतो.

– केस आणि त्वचेला मजबूत आणि निरोगी ठेवण्यासाठी रोज तीळ खाणे लाभदायक मानले जाते.

– तीळामध्ये असणारे प्रोटीन पूर्ण शरीराला भरपूर ताकद आणि एनर्जी देण्याचे काम करतो.

Makar Sankranti
Makar Sankranti

Rupal Deshmukh