अंडरवर्ल्डचा डॅडी,आमदार ते जेल..!!

0
1364

अंडरवर्ल्डचा डॅडी अरूण गवळीचा

अरूण गवळीचा जन्म अहमदनगरमधील कोपरगावात झाला, अरूण गवळीचे वडील गुलाबराव हे मुंबईतील कापड गिरणीत काम करायचे. 1970-80 दशकात मुंबईतील कापड गिरण्या बंद पडल्या यामुळे अनेक जण बेरोजगार झाले. या बेरोजगारीतून अरूण गवळीने झटपट पैसे कमवण्याचे साधन म्हणून हफ्ते घ्यायला सुरवात केली. रमा नाईक आणि बाबू रेशीम यांची “भायखळा कंपनी” या गॅगमध्ये तो शामिल झाला. 1988 साली रमा नाईक पोलीस एनकाऊंटर मध्ये मारला गेला. त्यानंतर अरूण गवळी भायखळ्यातील दगडी चाळीतून आपले साम्राज्य चालवू लागला. गवळीचे असे म्हणणे आहे की ज्या एनकाऊंटरने रमा नाईक मेला तो दाऊदनेच घडवून आणला होता. तेव्हापासून अरूण गवळी आणि दाऊद कट्टर प्रतिस्पर्धी झाले. 1988-90 च्या गॅगवारच्या काळात गवळी गॅगला घाबरून डी-कंपनी चे गैंगस्टर शरद शेट्टी, छोटा राजन, छोटा शकील और सौत्या (सुनील सावंत) हे मुंबई सोडून दुबई पळून गेले.

अरूण गवळीचा परिवार.. अरूण गवळीने पुणे जवळील वडगाव पाचपीर येथील मोहम्मद शेख लाल मुजावर नान्हुभाई यांच्या मुलीशी लग्न केले. हिंदू धर्मांतर करून तिचे नाव आशा ठेवले. आशा गवळी यांना गीता गवळी आणि महेश गवळी नावाचे दोन मुले आहेत. वंदना गवळी या अरूण गवळीच्या भावजई आहेत. माजी मंञी सचिन अहिर हे अरूण गवळीचे भाच्चे आहेत.

राजकारणात प्रवेश… अरूण गवळीने अखिल भारतीय सेना नावाचा 1997 साली पक्ष काढला. 2004 साली त्याने चिंचपोकळी मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि तो निवडून देखील आला. अरूण गवळी आमदार झाला. त्यांची पत्नी आशा गवळी या पण आमदार होत्या. मुलगी गिता गवळी व भावजई वंदना गवळी या मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविका आहेत. 2007 ला मुंबई महापालिकेत शिवसेनाला बहूमतात येण्यासाठी जागा कमी पडत असताना अखिल भारतीय सेनेच्या 4 नगरसेवकांनी पाठींबा दिला आणी सेना सत्तेत राहीली. पोलीसांनी खुप वेळा दगडी चाळीवर धाडी टाकल्या पण अरूण गवळी त्यांना कधी सापडला नाही. बर्‍याच गुन्ह्यातून पुराव्या अभावी त्याची सुटका होत असे.

एकेकाळी अरूण गवळीची लोकप्रियता एवढ्या शिगेला पोहचली होती की सेना प्रमुख ‘बाळासाहेब ठाकरे यांनी “तूमचा दाऊद तर आमचा अरूण गवळी” अशी घोषणाच केली होती. पुढे चालून अरूण गवळीचे बाळासाहेंबाशी खटके उडाले आणि अरूण गवळीने शिवसेनेला टक्कर म्हणून अखिल भारतीय सेना नावाचा पक्ष काढला.मुंबईने आजवर अनेक अंडरवर्ल्ड डॉन्स पाहिले. पण यातला कोणताही डॉन कायद्याच्या कचाट्यात सापडू शकला नाही. पण आता अरूण गवळी एका खून खटल्यात दोषी सिद्ध झाला आहे. शिवसेना नगरसेवक कमलाकार जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी 2008 साली अटक झाली. 2012 साली कोर्टाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली