अमेरिकेतील छञपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा इतिहास

0
3195
Shivaji Maharaj SanJose - Being Marathi
Shivaji Maharaj SanJose - Being Marathi

अमेरिकेतील छञपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा इतिहास

छत्रपती शिवाजी महाराज अमेरिकेतील ही मूर्ती कॅलिफोर्निया प्रांतातील सान जोस येथील नदीकिनारी असणाऱ्या गौदालुपे पार्क (guadalupe river park san jose, california) येथे आहे.

Guadalupe River Park - Being Marathi
Guadalupe River Park – Being Marathi

या स्मारकाची उंची साधारणतः ४ फूट असून त्याचे वजन २०० पौंड पेक्षा अधिक आहे. शिवरायांचे हे शिल्प “बी.आर.खेडकर” यांनी बनविले असून यासाठी सुमारे १ लाख रुपयांचा खर्च आणि ३ महिन्यांचा कालावधी लागला आहे.

Guadalupe River Park - Being Marathi
Guadalupe River Park – Being Marathi

हे शिल्प कॅलीफोर्नियातील बगीच्यात साधारणतः २०><२० एवढ्या जागेत बसविले आहे. हा पुतळा “स्यान जोसे- पुणे सिस्टर कमिटी ” तर्फे पुण्याचे तात्कालिक महापौर शिवश्री दत्ता गायकवाड यांच्या हस्ते स्यान जोसे शहराचे महापौर रोन गोंझाले यांना भेट म्हणून देण्यात आला.

Guadalupe River Park - Being Marathi
Guadalupe River Park – Being Marathi

ज्या चबूतऱ्यावर शिवरायांचे हे शिल्प उभे केले आहे त्या चबूतऱ्यावर शिल्पाविषयी माहिती देणारा एक स्टीलचा फलकही लावण्यात आला आहे.या फलकावर इंग्रजी भाषेतून पुढील मजकूर कोरला आहे-

“SHIVAJI FOUNDED PUNE (CIRCA1640).HE WAS THE FIRST MODERN WARRIOR WHO SUCCESSFULLY FOUGHT THE FOREIGN INVADERS FOR 40YEARS AND ESTABLISHED A MARATHA KINGDOM. THAT LASTED 200 YEARS WITH PUNE AS ITS CAPITAL.”

Guadalupe River Park - Being Marathi
Guadalupe River Park – Being Marathi

याचा स्वैर अर्थ “शिवाजी राजांनी पुणे हे शहर वसवले. आधुनिक भारतातील शिवाजी हा पहिला थोर राजा होता ज्याने परदेशी शक्तींशी सर्व शक्तीने लढा दिला आणि मराठा साम्राज्याची मुहुर्तमेढ रोवली. त्यांचे हे साम्राज्य पुढे २०० वर्ष टिकले ज्यात पुणे हे महत्वाचे.

Guadalupe River Park - Being Marathi
Guadalupe River Park – Being Marathi