हे आहेत दिवाळीतील 6 बिझनेस, महिनाभरात करा लाखोंची कमाई

0
2651

हे आहेत दिवाळीतील 6 बिझनेस, महिनाभरात करा लाखोंची कमाई

 

फेस्टिवल सिझनला आता सुरवात होत आहे. या सिझनमध्ये घरी बसून व्यवसाय करून तुम्हाला अवघ्या 40 दिवसांत लाखोंची कमाई करण्याची संधी आहे. यासाठी तुम्हाला केवळ 10 ते 15 हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. विशेषत: महिलांना घरी बसून काही ना काही काम करून पैसे कमावण्याची इच्छा असते. त्यांच्यासाठी दिवाळीचा सण हा पर्वणी ठरू शकतो. तर मग आजच तुम्ही या सहापैकी एखादा बिझनेस निवडा. अवघ्या एका महिन्यात तुम्ही लाखोंची कमाई सहज करू शकता.

1) होममेड चॉकलेट

सणासुदीच्या काळात चॉकलेटची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. घर बसल्या हा व्यवसाय सुरु करता येणे सहज शक्य आहे. या काळात होममेड चॉकलेटचा व्यवसाय करणऱ्या सोनिया वर्मा यांनी दिव्य मराठी वेब टीम ला सांगितले की, होममेड चॉकलेटचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढतोय. जर तुम्हाला घरी चॉकलेट तयार करून क्रिएटीव्ह पॅकींग करण्याची आवड असेल, तर या आवडीला सणासुदीच्या अगोदर व्यवसायामध्ये बदलू शकता.
– हा व्यवसाय सुरु करण्यासाठी 15 ते 20 हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. यासाठी लागणारे पॅकींग मटेरीयल तुम्ही ठोक बाजारातून खरेदी करू शकता.
– या गुंतवणूकीतून तुम्ही 30 ते 35 टक्के रिटनर्स मिळवू शकता. त्याचबरोबर तुम्ही तुमचे उत्पादने ऑनलाईन, रिटेल आणि ठोक बाजारात विकू शकता.
– फेसबुक, टि्वटरवर आपल्या उत्पादनाचे पेज तयार करून तुम्ही मार्केटींग करू शकता. ज्यामुळे ग्राहक तुमच्या उत्पादनापर्यंत सहजासहजी पोहचू शकतील.

2) होम बेस्ड बेकरी प्रोडक्ट

तुम्हाला बिस्कीट, नानखटाई आणि केक यांसारखे बेकरी प्रोडक्ट तयार करण्याची आवड असेल, तर या आवडीला व्यवसायात रुपांतरीत करायला हरकत नाही. दिवाळी, दसरा, पाडव्या सारख्या सणासुदीच्या काळात या उत्पादनांची मागणी वाढलेली असते. घरातून होम बेस्ड बेकरी चालविणारे रमण लांबा म्हणाले, की बेकरी व्यवसायात तुम्हाला केवळ 15 ते 20 हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागते. त्याशिवाय पॅकींग मटेरिअल आणि पॅकींग मशीन खरेदी करावे लागेल.
– सुरवातीला बिस्कीट, नानखटाई आणि केक यांसारखे उत्पादने ओव्हनमध्ये तयार करू शकता.
– व्यवसायात वाढ झाल्यावर कमर्शिअल ओव्हन खरेदी करू शकता. यामध्ये गुंतवणूकीच्या 30 ते 35 टक्के रिटर्न नफा मिळू शकतो. ही उत्पादने तुम्ही रिटेल, ऑनलाईन आणि ठोक बाजारात विकू शकता.

3) कुशन कव्हर, कर्टनची ऑनलाईन विक्री

– सणासुदीच्या काळात घर सजावटीचे कुशन कव्हर, बेडशीट, टेबल मॅट आणि पडद्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. ही उत्पादने ऑनलाईन विक्री करणाऱ्या गुडिया शर्माने सांगितले की, जर तुम्हाला ही उत्पादने तयार करण्याची आवड असेल, तर तुम्ही हा व्यवसाय करू शकता.
– यासाठी लागणारा कच्चा माल तुम्हाला लोकल मार्केटमध्ये मिळू शकतो. आपण तयार केलेल्या उत्पादनांचे फोटो काढून ऑनलाईन वेबसाईटवर पोस्ट करू शकता.
– या व्यवसायात 5 हजार रुपये गुंतवणूक करून तुम्ही 10 ते 15 हजार रुपये कमवू शकता.

4) घर सजावटीचे प्रोडक्ट

– दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात घर सजावटीच्या उत्पादनांना मोठी मागणी असते. जर तुम्हाला पेपर फ्लॉवर, वॉल हँगिंग, डेकोरेटीव्ह पीस तयार करण्याची आवड असेल, तर तुम्ही ही आवड घरापुरती मर्यादित न ठेवता व्यवसायात रुपांतर करू शकता.
– हा व्यवसाय करणाऱ्या मंजू शर्मा म्हणाल्या की, आम्ही घरीच डेकोरेटीव सामान तयार करून रिटेल मार्केटमध्ये विकतो.
– ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर या उत्पादनांना अधिक मागणी असते.
– हा व्यवसाय अवघ्या तीन हजार रुपयांच्या गुंतवणूकीने सुरु करता येतो. याद्वारे महिन्याला किमान 10 ते 15 हजार रुपये कमाई होऊ शकते.

5) डेकोरेटीव्ह ड्राय फ्रूट पॅकींग

– सणासुदीच्या काळात मिठाई व्यतरिक्त ड्राय फ्रूटला मोठी मागणी असते.
– सदर बाजारासारख्या ठोक बाजारात सजवलेले ड्राय फ्रूटचे डब्ब्यांना मागणी असते.
– या डब्ब्यांमध्ये ड्राय फ्रूट भरून लोकल मार्केटमध्ये विक्री करू शकता.
– यादरम्यान डेकोरेटीव्ह ड्राय फ्रूटची सर्वाधिक विक्री होत असते.
असा सुरु करा हा व्यवसाय
– या व्यवसायाबाबत सतिंदर चौहान म्हणाले, की सदर बाजार आणि चावडी बाजारात ठोक 50 ते 5 हजार रुपयांपर्यंत ड्राय फ्रूटचे डब्बे मिळतात.
– डब्ब्यांच्या डिझाईन आणि आकारानुसार किंमत ठरते.
– एक डब्बा तयार करण्यासाठी 130 ते 150 रुपये इतका खर्च येतो. हा डब्बा 250 रुपयांनी विकला जातो. म्हणजेच प्रत्येक डब्ब्यामागे 40 ते 45 टक्के नफा मिळतो.
– मागील वर्षी तब्बल 5 हजार डेकोरेटीव्ह डब्बे विकले होते. यातून तब्बल 5 लाख रुपयांची कमाई झाली हेाती.
– हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तब्बल 5 हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागते.

6) स्वीट्स, चॉकलेट गिफ्ट पॅक

– दिवाळी, दसऱ्यानिमीत्त गिफ्ट देण्यासाठी चॉकलेट, फ्रुटी, सॉफ्ट ड्रिंक्स सर्वाधिक खरेदी केले जातात.
– सदर बाजारातील ताराचंद गुप्ता म्हणाले, की सणाच्या साधारणत: एक आठवडापूर्वी दुकानदार स्वत: गिफ्ट आयटम विक्री करण्यास सुरु करतात.
– बीकानेरवाला, हल्दीराम, प्रियागोल्ड, पेप्सी, कोकाकोला, फ्रुटी आणि चॉकलेट कंपन्या फेस्टिवल पॅक सादर करतात. यादरम्यान तुम्ही पॅकींग व्यवसाय सुरु करून चांगले उत्पन्न मिळवू शकता.
– तुम्ही या कंपन्यांच्या वेबसाईटवर जाऊन बल्कमध्ये उत्पादने खरेदी करू शकता.
– यामध्ये कंपनी तुम्हाला 20 ते 30 टक्के मार्जिन देते. वेगवेगळ्या कंपन्यांचे मार्जिन वेगळे असते.
– हे गिफ्ट पॅक बाजारातील ठोक विक्रेत्यांकडूनही खरेदी करता येऊ शकेल.
– सदर बाजारात ठोक व्यवसायिक एक ते दोन टक्के नफ्यावर काम करतात.
– यासंदर्भात् व्यवसायिक मोहित शर्मा म्हणाले, की 200 रुपये एमआरपी असलेल्या बॉक्समागे तब्बल 50 रुपये नफा मिळू शकतो.
– गेल्या वर्षी तब्बल 3 हजार डब्बे विक्री करून दिड लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता.
– या व्यवसायाची सुरवात केवळ 10 हजार रुपयांपासून सुरु करता येते.