मराठा आरक्षणाचा सातारा जिल्यातील पहिला लाभारती

0
206

महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाचा कायदा केल्यानंतर, आरक्षणाचे लाभ मिळण्यास सुरवात झाली आहे. कराड तालुक्यातील काले गावच्या अमित यादव हा मराठा आरक्षणाचा सातारा जिल्यातील पहिला लाभारती ठरला आहे. अमित यादवची स्पर्धा परीक्षेतून सार्वजनिक बांधकाम विभागात वर्ग 2 अर्थात क्लास टू अधिकारीपदी निवड झाली आहे.

अमित यादव हा मराठा आरक्षणाचा नोकरीमध्ये लाभ मिळालेला सातारा जिल्ह्यातील पहिलाच उमेदवार ठरला आहे. काले गावातील अमित यादव हा सामान्य अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील आहे. वडील आणि तीन चुलते असे एकत्र कुटुंब आहे. वडिलांनी खासगी नोकरी करुन मुलांना शिक्षण दिले. अमितने प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन सांगलीतील वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिरिंगमधून B.Tech ही पदवी मिळवली. डिप्लोमा ते डिग्री अॅडमिशनदरम्यान केवळ एका गुणाने त्याला हवं ते कॉलेज मिळालं नाही. अमितच्या रुपाने यादव कुटुंबातील पहिलाच व्यक्ती सरकारी नोकरीत रुजू झाला आहे. मराठा आरक्षणामुळे गरजूंना निश्चितच नोकरी आणि शिक्षणात फायदा होईल, असा विश्वास अमितने व्यक्त केला.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांचे सार्वजनिक बांधकाम खाते हे एसईबीसी आरक्षणाची अंमलबजावणी करणारं पहिलं खातं ठरलं आहे.

Comments

comments