अगरबत्ती विकणाऱ्या ह्या आजींना त्यांच्या स्वावलंबी आणि कष्टासाठी सलाम

0
828

अगरबत्ती विकणाऱ्या ह्या आजींना त्यांच्या स्वावलंबी आणि कष्टासाठी सलाम

स्थळ : मुलुंड (मुंबई) मध्य रेल्वे स्थानक, फलाट क्रमांक १ आणि २ मधील मुख्य पूल , वेळ : सायं ७ ते १२.
संध्याकाळच्या वेळी आपण येथून प्रवास करत असाल तर अगरबत्ती विकणाऱ्या ह्या चंद्रप्रभा आजींना तुम्ही नक्कीच पाहिल असेल. वयाच्या ८० मध्ये असून मोठ्या खंबीर मनाने अगरबत्ती विकणाऱ्या ह्या आजींना त्यांच्या स्वावलंबी आणि कष्टासाठी सलाम.

आजच्या महागाईच्या काळात गरीब परिस्थितीपुढे हतबल न होता लोकांपुढे हातपाय पसरून भिक मागण्यापेक्षा १५ रुपयांच्या अगरबत्ती विकून स्वकष्टाचा पैसा कमावण्यात त्यांना जास्त समाधान आहे.

मोठमोठ्या शॉपिंग मॉल मध्ये मिळणाऱ्या कुठल्याही नामांकित अगरबत्ती पेक्षा कोणतीही जाहिरात नसलेल्या ह्या अगरबत्तीला असणारा “स्वावलंबनाचा सुंगंध” अधिक दरवळणारा नक्कीच आहे आणि कदाचित देवाला हि तो खऱ्या अर्थाने भावणारा असेल.

एकच विनंती, जर आपण कधी इथून प्रवास केला आणि ह्या शर्ट- स्कर्ट मधल्या कष्टाळु आजी नजरेत पडल्या तर तुम्ही घेतलेली १५ रुपयाची अगरबत्ती त्यांना नक्कीच समाधान देऊन जाईल आणि त्यांना उदरनिर्वाहासाठी मदतही होईल. अश्याच काही गरजू आणि कष्टाळू वक्तींसाठी, आपण थोडी का होईना मदत केली पाहिजे.
धन्यवाद !