क्लाऊड कम्प्युटिंग क्षेत्रामध्ये दरवर्षी चार लाख नवे रोजगार

0
443
Cloud Computing - Being Marathi
Cloud Computing - Being Marathi

क्लाऊड कम्प्युटिंग क्षेत्रामध्ये दरवर्षी चार लाख नवे रोजगार

आयटी क्षेत्रात यंदा अन्य वर्षांच्या तुलनेत नोकरीच्या कमी संधी असल्याचे म्हटले जाते. पण आयटीशी संबंधित असलेल्या क्लाऊड कम्प्युटिंगच्या क्षेत्रात सातत्याने अनेक कंपन्यांची गरज बनत असून याच्याशी निगडित व्यावसायिकांची मागणीही वाढत आहे. एका सर्वेक्षणानुसार, क्लाऊड कम्प्युटिंग हा आता पर्याय नसून गरज बनली असल्याचे ७० टक्के कंपन्यांचे मत आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी याचा आधार घ्यावाच लागतो. त्याचप्रमाणे अन्य एका सर्व्हेनुसार देशातील सुमारे ७९ टक्के कंपन्या सध्या क्लाऊड सर्व्हिस वापरत आहेत किंवा सुरू करण्याच्या तयारीत आहेत. सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास क्लाऊड कम्प्युटिंग ही एक डिलिव्हरी सर्व्हिस असून यात संसाधन, सॉफ्टवेअर आणि माहितीची देवाणघेवाण करता येते. यात कंपन्यांकडून दिली जाणारी सेवा वापरण्यासाठी कोणत्या विशिष्ट ठिकाणी उपस्थित राहण्याची गरज नसते तर ते कुठूनही वापरता येऊ शकते.

Cloud Computing (5) - Being Marathi
Cloud Computing (5) – Being Marathi

गार्टनरच्या अहवालात विशद करण्यात आलेल्या शक्यतानुसार, देशात क्लाऊड सर्व्हिसेस बाजार यंदा ३८ टक्क्यांनी वाढून १.८१ अब्ज डॉलरवर पोहोचेल. शिवाय, क्लाऊड कम्प्युटिंगशी संबंधित विविध सेवा भविष्यात वेगाने वाढतील. अहवालानुसार, २०१६ मध्ये देशातील क्लाऊड उद्योग प्रक्रिया सेवा बाजार ११३ अब्ज डॉलर होता. २०२० अखेरपर्यंत तो वाढून २३६ अब्ज डॉलरपर्यंत जाऊ शकतो. यात सर्वाधिक विकासाची शक्यता अॅप्लिकेशन्स आणि क्लाऊड सिस्टिम इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेसमध्ये आहे. क्लाऊड अॅप्लिकेशन सर्व्हिस बाजार २०१६ मध्ये ३९६ अब्ज डॉलर होता. २०२० पर्यंत यात १००६ अब्ज डॉलरची उलाढाल होऊ शकते. क्लाऊड सिस्टिम इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसचा व्यवसाय २०१६ अखेरपर्यंत ४८६ अब्ज डॉलर होता. २०२० पर्यंत तो २०२८ अब्ज डॉलरवर जाण्याची शक्यता आहे. या क्षेत्रात २०१२ ते २०१७ या काळात २० लाख नवे रोजगार येतील, अशी शक्यता एका अहवालात वर्तवण्यात आली आहे. म्हणजेच दरवर्षी सरासरी ४ लाख नोकऱ्यांची संधी आहे.

पायाभूत सुविधांसोबत या क्षेत्रातील बारकावे माहीत असणाऱ्या मनुष्यबळाची क्लाऊड कंपन्यांना गरज असते. त्यासाठी संबंधित मनष्युबळास संसाधन व्यवस्थापन, देखरेख, डाटा अॅनालिटिक डिव्हाइस मोबिलिटी, युजर इंटरफेस, मल्टी आर्किटेक्चर अॅप्लिकेशन प्लॅनिंग, व्हर्च्युअलायझेशन आणि पॅरलल प्रोग्राममिंगसारख्या कौशल्यांची गरज असते.

संगणक विज्ञानातील पदवीधर घेऊ शकतात प्रवेश

Cloud Computing (4) - Being Marathi
Cloud Computing (4) – Being Marathi

या क्षेत्रात करिअर करण्यासाठी किमान संगणक विज्ञानातील पदवी आवश्यक असते. गणित विषयास बारावी उत्तीर्ण विद्यार्थी कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगच्या बीई किंवा बीटेक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात. बीई किंवा बीटेक अभ्यासक्रमास प्रवेशासाठी जेईई मेनचा गुणानुक्रम आवश्यक असतो. कॉम्प्युटर विज्ञानात बीएसस्सीसुद्धा करता येते. क्लाऊड कम्प्युटिंग क्षेत्रात काम करण्यासाठी जावा, सी, सी++, पायथन, सी#, जावास्क्रिप्ट, पीएचपी, एसक्यूएलसारख्या प्रोग्रामिंग लँग्वेजची माहिती असायला हवी. तथापि, पदवीनंतर क्लाऊड कम्प्युटिंगशी संबंधित अल्प कालावधीचे अभ्यासक्रम केल्याने करिअरमध्ये बढतीची शक्यता वाढते.

वैविध्यपूर्ण पदांवर काम करण्याची संधी

Cloud Computing (4) - Being Marathi
Cloud Computing (4) – Being Marathi

जवळपास सर्वच क्षेत्रांतील कंपन्या उत्तम प्रगती साधण्यासाठी क्लाऊड कम्प्युटिंगची मदत घेत आहेत. त्यामुळे यात रोजगाराच्या शक्यता अधिक होतात. क्लाऊड कम्प्युटिंग प्रोफेशनल कंपन्यांत क्लाऊड आर्किटेक्ट, क्लाऊड डेव्हलपर, क्लाऊड कन्सल्टंट, क्लाऊड सिस्टिम अॅडमिनिस्ट्रेटर आणि क्लाऊड सेक्युरिटी स्पेशालिस्ट पदावर काम करता येते. शिवाय, मायक्रोसॉफ्ट, गुगल, अॅमेझॉन, आयबीएमसारख्या क्लाऊड क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांतही रोजगाराच्या चांगल्या संधी आहेत.

नवोदितांना सरासरीपेक्षा चांगले वेतन

Cloud Computing (1) - Being Marathi
Cloud Computing (1) – Being Marathi

क्लाऊड कम्प्युटिंग मनुष्यबळाची मागणी जास्त असल्याने वेतन चांगलेच आहे. करिअरच्या सुरुवातीलाच नवोदितांना वार्षिक सरासरी ३ ते ४ लाख रुपयांचा पॅकेज मिळण्याची शक्यता आहे. तथापि काही वर्षांच्या अनुभवानंतर हे पॅकेज वार्षिक ८ लाखांपर्यंत जाऊ शकते. वरिष्ठ स्तरावर वार्षिक १६ ते २० लाख रुपयांचे पॅकेज मिळू शकते.

source : http://divyamarathi.bhaskar.com/…/BUS-INDN-jobs-in-cloud-co…
#क्लाऊडकम्प्युटिंग #cloudcomputing