गेल्या ७० वर्षात देशाने हा विकास केलाय म्हणत सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला सुनावले खडे बोल..

0
2575

गेल्या ७० वर्षात देशाने हा विकास केलाय. UNO त सुषमा स्वराज गर्जल्या…

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्राच्या महासभेला संबोधित करताना पाकिस्तानला खडे बोल सुनावले. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानसोबत शांतीचे संबंध प्रस्थापित व्हावेत, तसेच दोन्ही देशांदरम्यान मैत्रीपूर्ण संबंध तयार व्हावेत यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले.

परंतु, पाकिस्तानने काय तयार केले? पाकिस्तानने दहशतवादी संघटना तयार केल्या. निरपराध माणसांचे रक्त सांडवणारा पाकिस्तान आम्हाला मानवी हक्क काय असतात हे सांगत आहे’, अशा शब्दांत सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत संबोधित करताना पाकिस्तानचे कान पिरगाळले.

युनोत त्यांनी पाकिस्तान ला ठणकाऊन सांगितलं कि एकाच वेळी जन्माला आलेले देश पण आज भारताने ७०वर्षात वेगवान विकास केलाय एक महाशक्ति म्हणुन ऊदयाला आलाय आणी पाकिस्तान दारिद्यात खितपत पडलाय..आम्ही आयआयटी,एम्स, सारख्या संस्था निर्माण केल्यात.भारताने जगाला डाॕक्टर्स आणी शास्त्रज्ञ दिलेत आणि पाकिस्तान ने दहशतवादी दिले.