अबब, फेरारी कारपेक्षा महागडा आहे हा रेडा…!!

0
1480

आश्चर्यचकीत झाला असाल ना या रेड्याची किंमत ऐकून. होय, फेरारी कारपेक्षाही या रेड्याची किंमत जास्त आहे. या रेड्याला दरदिवशी वेगवेगळ्या ब्रॅडची दारू प्यायला लागते. हरियाणातील बुढाखेडा गावातील नरेश बेनिवाल यांच्या घरी हा रेडा आहे. मुराह जातीचा हा रेडा सध्या हरियाणात त्याच्या किमतीने चर्चेत आला आहे. नरेश यांनी या रेड्याचे नाव “सुलतान” ठेवले आहे. फरीदाबाद येथे चालू असलेल्या कृषी संमेलनात “सुलतान” ला 21 कोटीची बोली लागली. पण नरेश यांनी तो विकला नाही. त्याचे म्हणणे आहे की ते सुलतानला मुलासारख सांभाळतात.

ते त्याला विकू शकत नाहीत, या संमेलनात सुलतान सोबत सेल्फी काढण्यासाठी लोक वेडावले होते. रेड्याचे मालक नरेश यांनी बोलताना सांगितले. सुलतानचे वजन तब्बल 17 क्विंटल म्हणजेच सतराशे किलो आहे. तो सहा फूट उंच आहे. नरेश यांचा दावा आहे की जगातील सर्वात उंच रेड्यात सुलतान एकमेव आहे. 7 वर्ष दहा महीने वय असलेल्या सुलतानला दरदिवशी 100 मिली स्काॅच दारू प्यायला लागते. त्याशिवाय तो काही खात नाही. प्रत्येक दिवशी वेगवेगळी दारू त्याला लागते. रविवारी टिचर्स, सोमवारी ब्लॅक डाॅग, बुधवारी 1000 पाइपर, गूरवारी बॅलेनटाईन, शुक्रवारी ब्लॅक लेबल, शनिवारी चिवास रिगल दारू तो पितो.

आठवड्यातून फक्त मंगळवारी हा रेडा कोणतीच दारू पित नाही. मंगळवार हा सुलतानसाठी ड्राय डे असतो… सुलतान कमवतो महीन्याला चार लाख रूपये… राम नरेश यांचा दावा आहे की सुलतान दर महीन्याला चार लाख रूपये कमवून देतो. सुलतान वर्षभर 30 हजार स्पर्मचे डोस देतो.

जे 300 रूपये प्रति डोस बाजारात विकले जातात. या हिशोबाने तो वर्षाला 90 लाख रूपये कमवून नरेश यांना देतो. या व्यतिरिक्त विविध ठिकाणी असलेल्या कृषीप्रदर्शानातील बक्षीसे पण सुलतानच्या नावावर येतात. नरेश यांनी सुलतानला रोहतकच्या बाजारातून पाच वर्षांपूर्वी 2 लाख 70 हजार रूपयाला विकत घेतले होते.

सुलतानचा खुराक ऐकून चक्रावाल… सुलतानला 10 किलो दाणे तसेच दुधही पाजले जाते, दिवसाला 35 किलो हिरवा आणि 35 किलो वाळला चारा दिला जातो. सुलतान सफरचंद, गाजर पण खातो. हिवाळ्यात 15 किलो सफरचंद तर उन्हाळ्यात दिवसाला 20 किलो गाजर त्याला खाऊ घातले जाते. नरेश यांचे म्हणणे आहे की त्याच्या चार्यावर दिवसाला अडीच हजार रूपये खर्च होतात..