भारतात शोध का लागत नाही

0
2715

भारतात शोध का लागत नाही…? ते गेले चंद्रावर पण पांडू का राहिला डोंगरावर…?

याचे कारण असे -भारतात जर एखाद्या मुलाने आपल्या आजीला विचारले की ,”आजी, वीज का चमकते ?”तेव्हा आजीचे उत्तर असते -“बाळा! वरती एक म्हातारी दळन दळतेय त्या जात्याच्या आवाज येतोय आणि दळताना ठिणग्या उडत आहे. “पाऊस का पडतो याची तर मुले काहीही उत्तरे देतात. (लहानपणी माझ्यापेक्षा थोडी मोठी मुले मला सांगायची की वरतून इंद्रदेव —-करतो तेव्हा पाऊस पडतो.) अशा प्रकारची उत्तरे दिली जातात म्हणून मुले विचार करत नाही व त्यामुळे भारतात शोध लागत नाही.

दुसरा प्रसंग असा, एकदा एका लहान मुलाने आपल्या आईला विचारले ,”आई तू स्वयंपाक करत आहेस .चुल्ह्यावरील भांड्यावर जे झाकण ठेवलेय ते असे वरखाली का होत आहे? आई म्हणाली”बाळा ! मला माहित नाही पण तू शोध .”तिने असे उत्तर दिले नाही की ,खालून कोणीतरी लाथा बुक्के मारत आहे म्हणून .”—-तो मुलगा होता James Watt त्याने आपल्या प्रश्नाचे उत्तर शोधून’वाफेच्या इंजिन’चा शोध लावला. ज्या देशात प्रश्नांची उत्तरे शोधण्यास वाव मिळतो तेथेच शोध लागतो.

हे झाले एक उदाहरण अहो ! दिवसातून कितीतरी बाबी अशाच पद्धतीने घडत असतात.तिकडे पदोपदी विज्ञान तर इकडे पदोपदी अज्ञान अशी स्थिती आहे. उदा.Beta !दारावर बसू नको ,नादारी (दारिद्र्य) येईल, दरवाज्यावर शिंकल्यासपाणी शिंपड नाही तर सर्दी होईल, काळा रंगाचा सदरा घालू नकोस आपल्याला चालत नाहीत, नाट लागलंय पाणी पिऊन जा, नवरदेवास खाटीवर बसू नकोस (दोऱ्यांचा लाकडी पलंग) मला सांगा बसलाच तर खालून कोणी लाथा बुक्के मारतोय काय?

म्हणजे बुद्धीची विटंबना चालू आहे फक्त ! विजेचे लोडशेडिंग कमी होईल कधीना कधी पण मेंदूचे चालू असलेले हे लोडशेडिंग कधी कमी होईल? पणजीने सांगितले तेच आजी सांगत आलीय आजीने सांगितले तेच आई सांगत आहे अशी आपल्या भारतीय समाजाची मानसिकता मेंढरावानी झालीय.

त्यात मधेच कुणीतरी बुवा, बाबा, बापू, कापू, भोपू, सोपू येतो आणि पोटार्थ साधून घेतो. उदा. चाळीसगाव (जळगाव) ला मागे विखरण या गावी मूर्ती प्रगत झाली असे सांगून लाखोंना फसविले. कधी चादरवाले बाबा आपल्या अंगावरून रोग बरे होण्यासाठी चादर फिरवतो तर कधी गुजरातची पार्वती maa पोटावर हात फिरवून मुल होईल अस सांगून लाखोंना फसवते.

उत्तर महाराष्ट्रात मागच्या वर्षी’भीक मागा अन बांगड्या भरा’असा प्रकार आला होता. एक—- एक रु.भीक मागून ७ किव्वा ११ बांगड्या भराव्यात म्हणजे देणाऱ्याचा व घेणाऱ्याचा नवरा व मुले सुरक्षित राहतील असा हा अज्ञान व अंधश्रद्धेचा प्रकार होता. म्हणजे कोणताही लाखाचा विमा काढायची गरज नाही (?) ७ ते ११ रुपयात’ अखंड भीक मागा सुरक्षित जीवन विमा योजना’असे प्रकार समाजात पसरविले जातात.

त्यात कुणीतरी हातातून कुंकू काढून आपण दैवीशक्ती असल्याचे सांगतो म्हणजे इथला माणूस नवस, व्रतवैकल्य, बाबा, बुवा, अंम्मा ,मांत्रिक-तंत्र ीकमध्ये इतका अडकलेला आहे की विचार करण्याची जणू काही पावरच संपली आहे.लक्षात ठेवा मित्रांनो , कर्मकांडामुळे कोणत्याही देशाची प्रगती होत नाही. वरील प्रकारांमध्ये गुंतल्यामुळे मेंदू गुलाम झाला.

आपण काय शोध लावणार ? आपण चंद्राची पूजा करतो आणि ते चंद्रावर पाय ठेवतात कारण ते दैववादी नसून प्रयत्नवादी आहेत.म्हणून भारतात कधी व्हाल्तेअर,सोक् रेतीस,न्युटन,का र्व्हर झाले नाहीत.भारतात धर्माच्या नावाखाली छेडछाड करणाऱ्यांचा व आर्थिक भले साधणाऱ्याचा आता गांभीर्याने विचार करावा.

तेव्हाच या देशात सुख,समृद्धी नांदेल आणि विचारात प्रगती होऊन शोध लागतील.आपण प्रत्येक घटनेमागे काय कारण आहे हे शोधले पाहिजे.मुलांना प्रश्न विचारू द्या.विचारायला लावा.माहित असेल तर जे वैज्ञानिक कारण आहे ते सांगा आणि माहित नसेल तर चुकीचे उत्तर देऊ नका ,त्यांना शोधायला सांगा. उदा. मागे समुद्राचे पाणी गोड झाले अशी बातमी पसरताच लोक बाटल्या भरून घरी घेऊन गेले व त्याची पूजा अर्चा केली.

आता यामागचे कारण म्हणजे समुद्राच्या किनाऱ्यावर येणारे नदीचे पाणी चांगले मिक्स न झाल्यामुळे पाणी खारट लागले नाही.लिंबू कापल्यावर रक्त का गळाले? याचे कारण MITHIL ORANGE व लीम्बुतील असिड ची अभिक्रिया होऊन रक्तासारखा पदार्थ गळतांना दिसला हे मुलांना सांगावे.

बऱ्याचदा मुलांनी प्रश्न विचारल्यावर तुला काय करायचं आहे? तुझ तू काम कर ?सांगितले तेव्हडे कर ? असे पुनर्प्रश्न केले जातात हे चुकीचे आहे.मुलांना प्रश्न विचारू द्यावेत.माहित नसेल तर आपल्या मित्राकडून किंवा जाणकार व्यक्तीकडून माहिती मिळवावी.मुलांना विज्ञान विषयाचे पुस्तके आणून द्यावेत. मग आपला पांडू नक्कीच डोंगरावरून चंद्रावर, कधी मंगळावर तर कधी गुरूवर जाईल.आणि भारतीय मुले जगाच्या पाठीवर नाव चमकवतील-