एका असामान्य जिद्दीची कहाणी – धीरूभाई अंबानी

0
979
Dhirubhai Ambani - Being Marathi
Dhirubhai Ambani - Being Marathi

एका असामान्य जिद्दीची कहाणी – धीरूभाई अंबानी

‘Think big, think fast, think ahead. Ideas are no one’s monopoly.’ याचा अर्थ होतो. मोठा विचार करा. लवकर विचार करा आणि दूरचा विचार करा. विचारांवर कोणा एकाची सत्ता नसते. असे यशाचे प्रेरणादायी विचार देणारे भारतातील महान व्यक्तित्व म्हणजे ‘रिलाययन्स’ कंपनीचे संस्थापक दिवंगत धीरूभाई अंबानी. ज्यांचे संपूर्ण जीवन इतरांसाठी प्रेरणा आहे, अशा धीरूभाई अंबानींबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

संपूर्ण नाव- धीरजलाल हीरालाल अंबानी
पित्याचे नाव – हीरालाल अंबानी
आईचे नाव – जमनाबेन अंबानी
जन्मतारीख – २८ डिसेंबर १९३२
जन्मस्थान- जुनागढ गुजरात
पत्नीचे नाव – कोकीलाबेन अंबानी
मुलांची नावे – मुकेश, अनिल, दीप्ती साळगावकर, नीता कोठारी

जन्मतःच एक अभूतपूर्व कार्यक्षमता घेऊन आलेले धीरूभाई अंबानी यांना लहानपणापासूनच मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करण्याची सवय होती. वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी ते येमेन देशात एका पेट्रोल पंपावर काम करू लागले. त्यापूर्वी ‘बर्माशेल’ नावाच्या कंपनीत ते काम करत असत. ‘बर्माशेल’ सारखी स्वतःची एक कंपनी स्थापन करण्याचे स्वप्न त्यांनी त्यावेळी पाहिले होते. आणि अर्थातच आपल्या अथक प्रयत्नांच्या जोरावर त्यांना ते पूर्ण केले.

Dhirubhai Ambani - Being Marathi
Dhirubhai Ambani – Being Marathi

१९५८ मध्ये येमेनहून भारतात परतल्यानंतर त्यांनी स्वतःकडील १५,००० च्या रकमेमधून ‘रिलायन्स कमर्शियल कार्पोरेशन (Reliance Commercial Corporation)’ची स्थापना केली. सुरुवातीला कंपनी मसाले आणि अन्य वस्तूंची निर्यात करत असे. काही काळानंतर, सिंथेटीक कपड्यांची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन, १९६६ साली त्यांनी अहमदाबादजवळील नरोडा येथे कपड्यांची गिरणी म्हणजेच मिल सुरू केली. या मिलने पहिल्याच वर्षी ९ कोटींचा व्यापार करून १३ लाखाचा नफा कमवला.

Dhirubhai Ambani - Being Marathi
Dhirubhai Ambani – Being Marathi

१९७५ साली ‘रिलायन्स’ ची उलाढाल त्यामानाने कमी होती. तिचे स्वरूप छोट्या कंपनीचेच होते. त्यावेळी भारतातील २४ कपड्यांच्या मिल्सचे परीक्षण करण्यासाठी विश्व बॅकचे शिष्टमंडळ आले होते. त्यांनी रिलायन्स मिलमधील कपड्यांची गुणवत्ता पाहून असा निष्कर्ष काढला की विकसित देशांमध्ये असलेल्या मिल्ससोबत तुलना होऊ शकेल अशी एकच मिल भारतात आहे, ती म्हणजे ‘रिलायन्स मिल.’ यावरूनच गुणवत्तेच्या बाबतीत धीरूभाई अंबानी पहिल्यापासूनच किती चोखंदळ होते, हे लक्षात येते. इ.स. १९९९-२००० मध्ये रिलायन्सने २५,००० कोटींची गुंतवणूक करून जामनगर, गुजरात येथे जगातील सर्वात मोठी रिफायनरी सुरू केली. हा प्रकल्प जगातील सर्वात मोठ्या प्रकल्पांपैकी एक गणला जातो.
१९७७ साली ‘रिलायन्स’ ने पहिल्यांदा स्वतःसाठी शेअर्स विकून पैसा उभा केला.

Dhirubhai Ambani - Being Marathi
Dhirubhai Ambani – Being Marathi

१९८२ नंतर तर कंपनीच्या प्रगतीचा आलेख वेगाने वर सरकू लागला आणि अजूनही हा आलेख वर चढतोच आहे. याचे बहुमोल श्रेय जाते धीरूभाई अंबानी यांच्या कार्यकुशलतेला. धीरूभाई अंबानी यांना लावलेल्या लहानशा रोपट्याचे रूपांतर एका मोठ्या वटवृक्षामध्ये झाले आहे. साल २०१२ पर्यंत रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये ८५,००० कर्मचारी काम करत होते. केंद्र सरकारच्या संपूर्ण करापैकी ५ टक्के कर फक्त रिलायन्सकडून भरला जात असे. २०१२ साली जगातील सर्वात मोठ्या आणि श्रीमंत म्हणवल्या जाणाऱ्या ५०० कंपन्यांच्या यादीत ‘रिलायन्स इंडस्ट्रीज्’ चा समावेश होता

Dhirubhai Ambani - Being Marathi
Dhirubhai Ambani – Being Marathi

१९७० ते ८० च्या दरम्यान निंयत्रित अर्थव्यवस्था होती. तेव्हाही ‘रिलायन्स’ मोठी कंपनी म्हणून विस्तारत होती. १९९१ नंतर मुक्त अर्थव्यवस्थेमुळे तर रिलायन्स उद्योगाच्या क्षेत्रात मोठ्या वेगाने धावू लागली. पेट्रोकेमिकल्स, ऑईल, रिफायनरी, तसेच दूरसंचार, वीज उत्पादन, रस्ते बांधकाम, बंदर, गॅस पाईप लाईन अशा जवळ जवळ सर्वच क्षेत्रात रिलायन्सने आपले पाय भक्कमपणे रोवले आहेत.

Dhirubhai Ambani - Being Marathi
Dhirubhai Ambani – Being Marathi

बहुराष्ट्रीय कंपन्यांशी असलेल्या स्पर्धेमध्ये भारतीय कंपन्या टिकू शकतात आणि यशस्वीही होऊ शकतात, हा विश्वास भारतीय उद्योजकांमध्ये निर्माण करण्यामागे धीरूभाई अंबानी यांचा फार मोठा हात आहे.

Dhirubhai Ambani - Being Marathi
Dhirubhai Ambani – Being Marathi

२००० साली मेंदूत झालेल्या गाठीमुळे पक्षाघाताच्या तीव्र झटक्याने धीरूभाई अंबानी यांचे निधन झाले. आपल्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी रिलायन्स आणि पर्यायाने विकसित भारतासाठी मोठी स्वप्ने पाहिली आणि ती प्रत्यक्षात खरी करून दाखवली. त्यांचा हा वसा त्यांची दोन्ही मुले मुकेश आणि अनिल अंबानी यशस्वीपणे पुढे चालवत आहेत.