१५० शेतकरी कुटुंबाला करोडपती बनवणारे असामान्य व्यक्तिमत्व मगरपट्ट्याचे संकल्पक सतीश मगर….

0
2703

पुण्यातील मगरपट्टा टाऊनशिप अत्यंत प्रसिद्ध आहे. रजनीकांत यांच्या शिवाजी द बॉस या चित्रपटात मगरपट्टा या टाऊनशिप चे चित्रीकरण झालेले आहे. हि टाऊनशिप कशी उभी राहिली हा प्रश्न पडलाच असेल. हि प्रसिद्ध टाऊनशिप कोण्या पिडीजात बांधकाम व्यावसायिकाने बांधली नाही तर पिढ्यानपिढ्या शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची आहे. या प्रसिद्ध निर्मिती मागे सतीश मगर यांचे नाव घेता येईल.

सतीश मगर हे एका शेतकरी जमीनदार घराण्यातुन आले आहेत. आजोबा राजकारणात होते तर त्यांचे वडील पुण्यातील पुणे इंजिनीरिंग कॉलेज मधून इंजिनिअर होऊन पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक बी जी शिर्के यांच्या कंपनीत जॉब करायचे नंतर त्यांनी स्वतःची फर्म सुरु केली. त्यातून ते डिफेन्स रिलेटेड छोटी मोठी कामे करायची १९७२ नंतर मात्र त्यांनी वडिलोपार्जित शेती व्यवसाय पाहणे सुरु केले. सतीश मगर यांचे आजोबा अत्यंत प्रगतशील विचारांचे होते. आपले नातू स्वतःला जमीनदार म्हणून ओळखू नये यासाठी त्यांनी सर्वाना शनिवारपेठ मध्ये शिक्षणासाठी ठेवले.

सतीश मगर यांची जडणघडण आजोबांनी वडिलांनी त्यांचे चुलते जे २० वर्ष आमदार व खासदार राहिलेले त्यांच्या विचारातून झाली. अत्यंत साधेपणा हा त्यांचा महत्वाचा गुणधर्म. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यांनतर सतीश मगर यांनी कृषी महाविद्यालयातून कृषी पदवी घेतली. कृषी पदवी घेण्याचे कारण हरित क्रांती आहे. कृषी पदवी घेतल्यांनंतर त्यांना देशातील एक वास्तव समजून आले. त्यांची पदवी पूर्ण झाल्यानंतर ते शेती कडे आले. याच दरम्यान त्यांच्या एका मित्राचे दुकान एम जी रोड येथे होते तो सतीश मगर यांच्या १५० एकर मधून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा जास्त कमावत होता. शेती हा व्यवसाय एकदम बेभरवशाचा वाटल्याने  त्यांनी १५० गायी घेऊन अत्याधुनिक दुग्धशामक यंत्रे घेऊन गोठा सुरु करून दुधाचा व्यवसाय सुरु केला. कधीतरी दूध उत्पादकांचे आंदोलन होऊन दूध रस्त्यावर फेकले जायचे दूध रस्त्यावर फेकून दिले कि दुसऱ्यादिवशी गाईला काय खाऊ घालणार आणि काय कमावणार? यातून त्यांना समजले कि शेती हा काही शाश्वत व्यवसाय होऊ शकणार नाही.

१९८५ साली त्यांनी दोन तीन मित्रांसोबत मार्केटिंग फर्म सुरु केली त्यातून एक चांगला अनुभव घेतला. त्याच कालावधी मध्ये मगरपट्टा परिसरातील शेतकरी आपल्या जमिनी बिल्डर ला विकत होते त्यातून आलेल्या पैशातून उधळपट्टी करून शेवटी कंगालीच्या वाटेवर यायचे. काहीतरी वेगळे केले पाहिजे हा त्यांच्यामध्ये विचार होता. त्यांना अगोदर वाटले कि आपण आपल्या जमिनीवर बंगले बांधून विकावेत पण ते व्यावसायिक वाटले नाही.


काही वर्ष शेती केली असल्याने त्यांचे परिसरातील सर्व शेतकऱ्यांशी संबध होते. सर्व शेतकऱ्यांना एकत्र घेऊन एक कंपनी स्थापून ज्यांची जेवढी शेती त्या प्रमाणात त्यांना कंपनी मध्ये भागीदारी देण्याचा त्यांचा विचार त्यांनी मांडला. या विचाराला बऱ्याच शेतकऱ्यांनी सहमती दिली. तसा या गोष्टीला विरोध हि करण्यात आला. पण सर्वांना व्यवस्थित समजावून भविष्यातील फायदे दाखवून देऊन तयार केले व मगरपट्टा टाऊनशिप ची पायाभरणी सुरु झाली. सतीश मगर लगेच प्रसिद्ध स्थापत्यविशारद हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडे गेले आणि त्यांना सांगितले कि त्यांना एक टाऊनशिप उभारायची आहे. त्यावर हाफिज कॉन्ट्रॅक्टर सोबत त्यांनी विस्तृत जमिनीचा अहवाल बनवला कुठे मोकळी जागा कुठे, शाळा कुठे, इत्यादी. माहिती आलेखबद्ध घेऊन महाराष्ट्राचे तेव्हाचे मुख्यमंत्री शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार साहेबानी सतीश मगर यांना विचारले आपण टाऊनशिप उभी करण्याबाबत गंभीर आहेत का ? हो म्हटल्यावर त्यांनी शहरी जमीन कमाल मर्यादा कायद्याबाबत विचारले व उत्तर दिल्यानंतर त्यांनी फाईल वर साइन केली व पुढे पाठवली.
काही दिवसांनी सरकार मधून त्यांना प्रोजेक्ट बद्दल चर्चा करण्यासाठी बोलावले अनेक तांत्रिक अडचणी होत्या त्या सॉल्व करण्यासाठी सतीश मगर यांचा प्रचंड वेळ गेला. यातून त्यांच्यातील चिकाटी व संयम हे गुण दिसून आले.याच काळात त्यांनी जगभरातील अनेक शहरांना भेटी दिल्या तेथील नगररचना अभ्यासली आपल्या देशातील हद्दप्पा व मोहेंजदडो संस्कृतीमधील नगर रचनेचा हि अभ्यास केला.
२००० साली मगरपट्टा टाऊनशिप च्या कामास प्रत्येक्ष सुरुवात झाली. पहिल्यांदा त्यांनी आय टी पार्क बांधणे सुरु केले त्यावेळी आयटी पार्क हा एक आकर्षणाचा मुद्दा होता. सुमारे ४३० एकर मध्ये हि टाऊनशिप होत होती. मगरपट्टा मधील हि सायबरसिटी पूर्णपणे कंपनीच्या मालकीची आहे त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा काही भाग मगरपट्टा सिटी च्या देखरेखीसाठी खर्च केल्या जातो . आज देशातील सर्वात मोठे १५ स्क्रीन चे थेटर माल हे मगरपट्टा मध्ये उभे आहे.


मगरपट्टा सिटी मधील भागधारक शेतकऱ्यांना बनवले उद्योगपती. अनेक शेतकऱ्यांच्या मुलांना सतीश मगर यांनी उद्योगासाठी प्रेरणा दिली अनेकजण यातून उद्योजक झाले. सतीश मगर यांनी स्वतःपुरता विचार ना करता सर्व आजूबाजूच्या शेतकऱ्यांचा हि विचार केला व एक देशातील सुंदर शहर वसवले व त्या शहरातील ३० टक्के मालकी कायमस्वरूपी शेतकऱ्यांना देऊन अनेक पिढयांना त्यांनी एक आदर्श निर्माण केला .
मगरपट्टा सिटी ची प्रेरणा घेऊन पुण्याच्या बाजूला ७०० एकर मध्ये नांदेड सिटी बनत आहे. हे एक क्रांतिकारी पाऊल सतीश मगर यांनी उचलले. जगभरात आज सतीश मगर यांचा गौरव झाला आहे तसेच क्रिडाई व मराठा चेम्बर्स चे ते अध्यक्ष म्हणून राहण्याचा मान हि त्यांना मिळाला आहे. सतीश मगर यांच्या पुढील वाटचाली साठी mahitipedia.com तर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा !! या असामान्य कर्तृत्व करणाऱ्या व्यक्तीबद्दल सर्व जनमानसाला माहिती व्हावी यासाठी हा लेख लिहिला आहे.


हा लेख आपल्याला आवडला तर नक्की लाईक करा दुसऱ्यांनी याव्यक्तीपासून प्रेरणा घेण्यासाठी हा लेख शेअर करा.

Comments

comments