1009 वेळा नाकारल्यानंतर त्यांना मिळाला पहिला होकार – KFC ची कहाणी

0
942

1009 वेळा नाकारल्यानंतर त्यांना मिळाला पहिला होकार – KFC ची कहाणी

मित्रांनो, KFC च्या फ्राईड चिकन च्या चवीबद्दल तर सगळ्यांना माहितच असेल. परंतु या चवीमागे जी संघर्षाची कहाणी लपली आहे त्याबद्दल फार थोड्या लोकांना माहिती आहे. या व्यक्तीने आपल्या जीवनात अनेक चढ उतार पहिले परंतु कधीच अडचणींपुढे हार मानली नाही आणि वयाच्या 65 व्या वर्षी यशाचे एक उत्कृष्ट उदाहरण कायम केले.

Colonel Sanders - Being Marathi
Colonel Sanders – Being Marathi

हि गोष्ट आहे कर्नल हरलँड डेविड सँडर्स ची जे कफक (Kentucky Fried Chiken) या फास्ट फूड रेस्टारेंट चेन चे संस्थापक आहे. कर्नल सँडर्स यांचा जन्म 9 सप्टेंबर 1890 मध्ये अमेरिकेतील इंडियाना प्रांतातील हेन्रीविले येथे एका गरीब कुटुंबात झाला. ते तीन भावंडं होते त्यांच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा ते केवळ 5 वर्षाचे होते. वडील गेल्यानंतर त्यांच्या जीवनातील खरा संघर्ष सुरू झाला. त्यांच्या आईने मुलांचे पालन-पोषण करण्यासाठी एका टमाटो-कॅनींग फॅक्ट्री मध्ये काम करायला सुरुवात केली. यामध्ये छोट्या बहीण भावाचे संगोपन करण्याची जबाबदारी सँडर्स यांच्या छोट्या खांद्यावर आली. स्वयंपाकात आईची मदत करता करता 7 वर्षाच्या वयातच ते सर्व पदार्थ बनविण्यात तरबेज झाले होते.

Colonel Sanders - Being Marathi
Colonel Sanders – Being Marathi

त्यानंतर काही वर्षांनी त्यांच्या आईने दुसरे लग्न केले. सँडर्स यांचे सावत्र वडील त्यांना आणि त्यांच्या भावंडांना नेहमी मारायचे. एक दिवस वडिलांच्या अत्याचाराला त्रासून सँडर्स घर सोडून पळून गेले आणि स्वतःसाठी म्हणून एका शेतात काम करायला लागले. त्यावेळी ते केवळ 11 वर्षाचे होते. काही वर्षे ते असेच धक्के खात जगले मात्र इतक्या अडचणीत सुद्धा त्यांनी हिंम्मत हारली नाही. वयाच्या 15 व्या वर्षी ते बस कंडक्टर बनले आणि 16 व्या वर्षी ते युनायटेड स्टेट आर्मी मध्ये सामील होऊन क्युबाला राहायला गेले.

Colonel Sanders  - Being Marathi
Colonel Sanders – Being Marathi

प्रारंभिक नोकरी आणि अपयश 

युनायटेड स्टेट आर्मी मध्ये आपला कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही काळ एका लोहाराकडे सहाय्यक म्हणून काम केले. त्यानंतर इलिनॉइस सेंट्रल रेलरोड मध्ये अग्निशामक म्हणून त्यांना नोकरी मिळाली. नोकरीमध्ये स्थैर्य  मिळाल्यामुळे त्यांनी ‘ जोसेफिइन किंग’ शी विवाह केला. त्यांनतर काही वर्षे पत्नी आणि 3 मुलांसोबत ते सुखी जीवन जगले. तथापि, एक दिवस त्यांचे आपल्या सहकाऱ्याशी भांडण झाले आणि त्यांना आपली नोकरी गमवावी लागली. दरम्यान त्यांची पत्नीही त्यांना सोडून गेली.

Colonel Sanders - Being Marathi
Colonel Sanders – Being Marathi

रेल्वे मध्ये नोकरीबरोबरच त्यांनी कायद्याचे एक प्रशिक्षण घेतले होते. जे त्यांना नोकरी गेल्यानंतर कमी आले. त्यांनी लॉ अभ्यास सुरू केला पण त्यांना त्यात स्थायित्व प्राप्त झाले नाही. वयाच्या 40 व्या वर्षापर्यंत ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकत राहिले. नोकरी वर नोकरी बदलत गेले आणि अनेक व्यवसायात आपले नशीब चालवून पाहु लागले. पण कोणत्याही कामात त्यांना यश मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी सर्विस स्टेशन खोलले परंतु सर्विस स्टेशन मधुन येणारे पैसे त्यांना पुरेसे नव्हते म्हणून त्यांनी सर्विस स्टेशन च्या मागच्या खोलीत टेबल, खुर्ची टाकून तेथे येणाऱ्या ड्राइवर आणि प्रवाश्यांना पेन-फ्राईड चिकन, हेम, स्टिक व अन्य खाद्य पदार्थ बनवून खाऊ घालू लागले.

Colonel Sanders - Being Marathi
Colonel Sanders – Being Marathi

लोकांना त्यांनी बनवलेले खाद्य पदार्थ इतके आवडले कि ते खाण्यासाठी खास ते तिथे येऊ लागले. खास करून त्यांनी बनवलेले पॅन फ्राईड चिकन लोकांना विशेष करून आवडायला लागले. त्यानंतर त्यांनी या पदार्थाच्या रेसिपी वर काम करून त्याला अधिक वेगळेपण देण्यास सुरुवात केली पण कालांतराने काही कारणास्तव त्यांना आपले हॉटेल विकावे लागले आणि 65 व्या वर्ष पर्यंत इतके काम करून सुद्धा त्यांच्याकडे काहीच पुंजी शिल्लक राहिले नाही. त्यावेळी त्यांना एक युक्ती सुचली आणि त्यांनी आपली खास फ्राईड चिकन रेसिपी विकण्याचे ठरवले.

Colonel Sanders - Being Marathi
Colonel Sanders – Being Marathi

त्यानंतर त्यांनी अनेक रेस्टांरेंटला भेट देऊन यासंबंधी चर्चा केली परंतु त्यांचा प्रस्ताव कोणीही स्वीकारला नाही. 1008 रेस्टांरेंटच्या मालकांनी प्रस्ताव अस्वीकारल्याने शेवटी 1009 व्या रेस्टांरेंटच्या मालकानी हा प्रस्ताव स्वीकारला आणि फ्राईड चिकन ची पहिली फ्रांचायझी साइन केली. या रेसिपीमुळे त्या रेस्टांरेंटची असाधारण भरभराट झाली आणि यामुळे अन्य रेस्टांरेंटनेही ती स्वीकारण्यास सुरवात केली आणि अश्याप्रकारे KFC रेस्टांरेंट चेनची सुरवात झाली. 16 डिसेंबर 1980 मध्ये लुकेमियामध्ये कर्नल सँडर्सकॅगे निधन झाले परंतु आज पण KFC चे स्टार आयकॉन म्हणून ते जिवंत आहे.

Colonel Sanders - Being Marathi
Colonel Sanders – Being Marathi

Colonel Sanders More Images –

Colonel Sanders - Being Marathi
Colonel Sanders – Being Marathi
Colonel Sanders - Being Marathi
Colonel Sanders – Being Marathi

Colonel Sanders - Being Marathi
Colonel Sanders – Being Marathi
Colonel Sanders - Being Marathi
Colonel Sanders – Being Marathi
Colonel Sanders - Being Marathi
Colonel Sanders – Being Marathi
Colonel Sanders - Being Marathi
Colonel Sanders – Being Marathi
Colonel Sanders - Being Marathi
Colonel Sanders – Being Marathi

Comments

comments