एस एल किर्लोस्कर यांची प्रेरणादाई कहाणी

0
606

एस एल किर्लोस्कर यांची प्रेरणादाई कहाणी

भारतात किर्लोस्कर समूहाचे नाव न ऐकलेली व्यक्ती अभावनेच सापडेल. शांतनूराव लक्ष्मणराव किर्लोस्कर हे या समुहाच्या जडणघडणीतील आधारस्तंभ असलेले प्रसिध्द उदयोजक. त्यांच्या वडिलांनी आणि काकांनी सुरुवातीला सायकलीचा अगदी छोटासा व्यवसाय सुरु केला. परंतु या छोट्या व्यवसायाचा खऱ्या अर्थाने वटवृक्ष बनवला तो एस.एल.किर्लोस्कर यांनी. प्रखर बुद्धिमत्ता, अपार मेहनत अन दूरदृष्टीच्या बळावर त्यांनी व्यवसायला गती दिली अन प्रगतीच्या वाटेवर मार्गक्रमण केले.

Kirloskar - Being Marathi
Kirloskar – Being Marathi

सायकलीपासून सुरु झालेला हा व्यवसाय पुढे हॉटेल आणि आदरातिथ्य सेवेपासून थेट इंजिन, मशीन उपकरण, यंत्र निर्मिति, विजेची मोटर आणि ट्रेक्टर निर्मितीपर्यन्त विस्तार पावला. आपल्या कुशल नेतृत्वाच्या बळावर एस.एल.किर्लोस्कर यांनी ‘किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड़’ ला जगविख्यात करून टाकले. किर्लोस्कर हे एक असे उद्योजक होते ज्यांचा स्वातंत्र्यापूर्वीपासूनच देशाची क्षमता आणि सामर्थ्यावर प्रचंड विश्वास होता. आर्थिक बळकटी ही सुध्दा लष्करी सामर्थ्याइतकीच महत्वाची असते, असे त्यांचे मत होते.

Kirloskar - Being Marathi
Kirloskar – Being Marathi

शंतनुराव लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचा जन्म 28 मे 1903 मध्ये सोलापूर येथे झाला. ते सर्व भावंडांमध्ये सर्वात मोठे होते. महाविद्यालयीन शिक्षण पुण्याला करून 1922 मध्ये मेकॅनिकल इंजीनियरिंगसाठी अमेरिकेतील मैसाचुसेटस् इन्स्टिट्युट ऑफ टेकॅनॉलॉजि येथे गेले. त्यानंतर इंजीनियरिंगचे शिक्षण पूर्ण करून 1926 मध्ये ते भारतात परतले. येथे आल्यावर त्यांनी एक असे औदयोगिक साम्राज्य तयार केले की ज्याचा विकासाचा वेग अविश्वसनीय होता. 1950 ते 1991 पर्यंत या समूहाच्या संपत्तीमध्ये 32,401% ची वृद्धी झाली जी कि अविश्वसनीयच होती.

Kirloskar - Being Marathi
Kirloskar – Being Marathi

सध्याच्या काळात किर्लोस्कर समूह हा भारतातील सगळ्यात मोठा इंजीनियरिंग समूह आहे. शंतनुराव यांनी किर्लोस्कर समूहात बराच कंपनीची स्थापना केली ते म्हणजे किर्लोस्कर आयल इंजिन, किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज, किर्लोस्कर न्यूमेटिक कंपनी, किर्लोस्कर एबरा पुम्पम्स लिमिटेड इत्यादी. किर्लोस्कर समूहाच्या नेतृत्वा व्यतिरिक्त ते इंडो-अमेरिकन चेंम्बर्स ऑफ कॉमर्स चे पहिले अध्यक्ष होते.तसेच त्यांनी रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि इंडस्ट्रियल डेंव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाचे निदेशक म्हणूनही काम केले.

Kirloskar - Being Marathi
Kirloskar – Being Marathi

देशाच्या अर्थव्यवस्थेतील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी भारत सरकारने कडून 1965 मध्ये पद्म भूषण देऊन त्याचा गौरव करण्यात आला.
तसेच 2003 मध्ये किर्लोस्कर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी टपाल तिकीट जारी केले.

Kirloskar - Being Marathi
Kirloskar – Being Marathi
Rupal Deshmukh