मुलगी झाल्यावर एक रुपयासुद्धा न घेणारा डॉक्टर

0
858
Dr Ganesh Rakh - Being Marathi
Dr Ganesh Rakh - Being Marathi

मुलगी झाल्यावर एक रुपयासुद्धा न घेणारा डॉक्टर

आजही मुलगी जन्माला येणं हे थोडंस निराशेनेच घेतलं जातं. एका मुलीमागे दुसरी मुलगी झाली तर पालक किंवा त्यांचे नातेवाईक तेवढ्या कौतुकाने तिच्या स्विकार करतील असं नसतं. बऱ्याचदा त्या मुलगीकडे आई किंवा आजीचं मुलगी जन्माला आली म्हणून नाक मुरडते.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील स्त्रीभ्रूण हत्या थांबविण्यासाठी प्रयत्न केले आणि बेटी बचाव बेटी पढाव या मोहिमेला सुरूवात केली. २०११ च्या जनगणनेनुसार भारतात दर १००० मुलांमागे मुलींचे प्रमाण ९१४ हे इतके आहे. यामुळे प्रत्येकाने यासाठी खास प्रयत्न करायला हवेत. फक्त सरकारी योजनांवर अवलंबून न राहता विचारांमध्ये बदल व्हायला हवा. आणि याची सुरूवात पुण्याच्या मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये झाली आहे. डॉ गणेश राख य़ांच्या या हॉस्पिटलमध्ये मुलींचा जन्म जणू एक उत्सव असल्यासारखा उत्साहात साजरा झाला आहे.

Dr Ganesh Rakh - Being Marathi
Dr Ganesh Rakh – Being Marathi

आतापर्यंत गणेश राख यांना ४४० मुलींचा जन्म अगदी आनंदाने साजरा केला आहे. मुलींच्या पालकांकडून कोणतेही शुल्क न स्विकारता त्यांचे स्वागत मिठाई लाटून केले आहे. मुलगी आज ही परक्याचं धन, मुली म्हणजे पालकांच्या जीवाला घोर अशा पद्धतीने विचार करणारे पालक पाहिले. भारतात पुरूषप्रधान संस्कृती आणि अनेक परंपरामुळे मिळणार मुलींना दुय्यम स्थान हे खूप जवळून पाहिलं.डॉ गणेश राख यांचे वडील धान्य बाजारात हमाल होते, तर आई दुसऱ्यांच्या घरी धुणी-भांडी करत होती, तेव्हा डॉ.राख यांचं पहेलवान होण्याचं पहिलं स्वप्न भंगलं. गणेश राख हे डॉक्टर झाले, डॉ.राख यांनी २००७ साली पुण्यात हॉस्पिटल सुरू केलं, मात्र पेशंटच्या मृत्यूची बातमी देण्यापेक्षाही, मोठं धैर्य मुलगी झाल्याचं नातेवाईकांना सांगणे, हे आहे की काय असे त्यांना वाटू लागले, कारण मुलगी झाल्यानंतर नातेवाईकांचा चेहरा उतरत असे, बहुतांश वेळेस कौटुंबिक दबावामुळे बाळाची आई रडायची.

Dr Ganesh Rakh - Being Marathi
Dr Ganesh Rakh – Being Marathi

मुलगी जन्माला आली की कुटुंबिय त्या नवजात बालकाला आणि आईला भेटणंही टाळत आणि त्यासोबत बिल भरताना देखील खूप वाद करत. अशावेळी काय करावा हा प्रश्न होताच. तसेच मुलींचा जन्म हा आनंदाने साजरा व्हायला हवं असं वाटूनही पालकांकडून तसा प्रतिसाद मिळत नव्हता. अशावेळी डॉ गणेश राख यांनी सिझर असो वा नॉर्मल डिलेव्हरी. मुलगी जन्माला आल्यानंतर कुटुंबियांकडून कोणतंही शुल्क न घेण्याचा निर्णय घेतला आणि ‘मुलगी वाचवा’ हा उपक्रम सुरू केली.हा उपक्रम फक्त पुण्यातच नाही तर देशभर सुरू आहे. विविझ तज्ञ, डॉक्टर्स या उपक्रमात सहभागी झाले आहे. मेडिकल क्षेत्रात नसलेल्या व्यक्तींना देखील या उपक्रमाला हातभार लावायचा असतो. अशावेळी अनेक सामाजिक भान असलेल्या व्यक्ती पुढे सरसावतात. एका सामान्य बेकरीवाला मुलीच्या जन्माला मोफत केक बनवतो. तर काही जण मुलींच्या जन्माला निसर्गाच्या सोबत साजरा करतात. मुलींच्या जन्माला अनेक झाडे लावून मुलींप्रमाणे त्यांची काळजी घेतात.

Dr Ganesh Rakh - Being Marathi
Dr Ganesh Rakh – Being Marathi

मुलीचा जन्म इतक्या विविध पद्धतीने साजरा होत असल्यामुळे डॉ राख यांनी खूप मोठा बदल समाजासमोर ठेवला आहे. या बदलामुळे समाजात जागृकता निर्माण झाल्यास लिंगभेदाचे काते आणि जुनाट विचारही दूर होतील.कमीत कमी स्टाफ सोबत अगदी प्रामाणिकपणे काम करून मुलगी वाचवा हा उपक्रम आम्ही करत आहोत. अनेकदा स्टाफचा पगारही वेळेवर देता येत नाही. किंवा उशिरा द्यावा लागतो. अशावेळी स्टाफ सुद्धा आनंदाने असतो. हे पाहून खूप समाधान मिळतं. आपण करत असलेल्या कामाचं आपल्या माणसांकडूनच कौतुक होताना पाहून बरं वाटतं, असं डॉ गणेश राख सांगतात.

Dr Ganesh Rakh - Being Marathi
Dr Ganesh Rakh – Being Marathi

३ जानेवारीपासून डॉ. राख यांनी या अभियानाला सुरूवात केली. तेव्हापासून आतापर्यंत त्यांच्या रूग्णालयात ४५४ मुली जन्माला आल्या आहेत. ५० किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावरून शेतमजूर त्यांच्या रूग्णालयात प्रसृतीसाठी येतात, कारण डॉक्टर पैसे घेत नाहीत, हे त्यांना माहित आहे, आजही गरीबांसाठी मुलगा असो किंवा मुलगी, यापेक्षा त्यांना आपत्य आणि कमी पैशात उपचार होणे महत्वाचं वाटतं. आता मुलीचा जन्म झाला की आई बाबा अक्षरशः डोळ्यातून पाणी काढतात. या अगोदर लेबर रूममध्ये गेलो तर पहिला विचार डोक्यात यायचा की मुलगी असेल तर काय होईल? पण आता बिनधास्तपणे पेशंटकडे लक्ष देताय येतं. आणि आता मुलीचा जन्म आनंदाने स्विकारला जातो हे पाहून खूप आनंद होतो.