हे आहेत ज्ञानोबा भोसले यांच्यामळे अनेक कृषीच्या विद्यार्थ्यांचे झाले भले…!!

0
2456

छायाचित्रात आपल्याला यशवंतराव चव्हाण साहेबांच्या शेजारी जे दिसत आहेत ते आहेत ज्ञानोबा बापू भोसले, साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील एकसळ या गावचे रहिवाशी, यशवंतराव चव्हाण यांचे सहकारी, यशवंतराव यांचे त्यांच्याशी नेहमी पत्रव्यवहार होत असत, यशवंतरावांनी त्यांच्या हस्ताक्षराने ज्ञानोबा बापू यांना लिहलेली पत्रे आज त्यांच्याकडे उपलब्ध आहेत.

यशवंतरावांनी आपल्या या सहकाऱ्याला राहुरी कृषी विद्यापीठ स्थापन करताना विद्यापिठावर सिनेट मेंम्बर म्हणून नियुक्त केले. ज्ञानोबा बापू भोसले हे त्यावेळी विद्यापीठाकडे जातीने लक्ष देत असत. विद्यापिठाच्या पहिल्या पदवीदान समारंभात विध्यार्थ्यांना पदवीदान करताना त्यांना असे जाणवले की ज्यांचा शेतीशी सहसा संबंध येत नाही अशे देशपांडे,पाठक, कुलकर्णी, मारवाडी, जैन अशीच मुले मेरिट मध्ये दिसत आहेत. ज्यांचा शेतीशी संबंध येतो असे कोणी त्यांना यात दिसले नाही.

या समस्याने ते व्यथित झाले. ज्यांच्या साठी आपण हे विद्यापीठ चालवत आहोत तिथे शिकणारे तेच लोक नसतील तर माझा इथे सिनेट मेंबर म्हणून राहण्यात काय फायदा ? त्यांनी तडकाफडकी विद्यापिठाच्या संचालक मंडळाची बैठक घेतली आणि ज्यांच्या घरी शेती आहे त्यांना आहे त्या मार्कांवर १२% मार्क जास्त गृहीत धरून प्रवेश देण्यात यावा असा तोडगा काढून त्यांनी तो तत्कालीन कृषी आयुक्त शंकरराव मोहिते यांच्याकडे पाठवला. शंकररावानी तो तत्कालीन मुखमंत्री वसंतराव नाईक यांच्यापुढे ठेवला.

वसंतरावांना पण ज्ञानोबा बापूचे मत पटले आणि तेव्हापासून ज्यांच्याकडे 7/12 असेल त्याला कृषी प्रवेशावेळी टक्केवारी वाढवून दिली जाते. या निर्णयाचे श्रेय ज्ञानोबा बापु यांच्या दूरदृष्टीला जाते. ज्ञानोबा बापु हे स्वतः प्रगतशील शेतकरी होतें. शेतीत नवे प्रयोग आले पाहिजेत या साठी ते आग्रही असत. यशवंतराव चव्हाण संरक्षणमंत्री असताना बापु यांनी आपल्या शेतीत आधुनिक पद्धतीने उत्पादित केलेला ६ किलोचा फ्लॉवर भेट दिला होता.

पंडित जवाहरलाल नेहरू यांचा साताऱ्यात शेतकरी मेळावा घेतला होता. यशवंतराव जेव्हा जेव्हा सातारा मध्ये येत असत ते आवर्जून ज्ञानोबा बापू यांची भेट घेत असत. बापू यांची प्रगतशील शेती पाहायला वसंतराव चव्हाण, आबासाहेब निंबाळकर, बाळासाहेब देसाई, आनंदराव चव्हाण यांच्यासारखे नेते येत असत. त्यांचे वडील कै. रामचंद्र गणपती भोसले यांना महाराष्ट्र शासनाने पहिला शेतीनिष्ठ शेतकरी या पुरस्कारांनी सन्मानित केले होते.

यशवंतराव पण कधी या आपल्या सहकाऱ्याला विसरले नाहीत. मोठ्या मोठ्या पदावर जाऊन पण ते स्वतः ज्ञानोबा बापू यांची खुशहाली पत्राने विचारत.ज्ञानोबा बापू यांचे आज रोजी ९१ वय आहे. ते उत्तम कुस्तीपटू होते. कुस्तीच्या त्यांच्या छंदामुळे आजही त्यांची प्रकृती अगदी ठणठणीत आहे. हे एवढ्या साठीच लिहले आहे की काही लोकांचे योगदान आपल्याला माहीत नसते. ते माहीत व्हावे यासाठीच हा प्रपंच…

-वैभव कोकाट

Seen by Vaibhav Kokat at 4:07pm

Comments

comments