या तरुणाने 30 हजारांत सुरु केला होता बिझनेस, आता 100 कोटींची आहे कंपनी

0
2470

या तरुणाने 30 हजारांत सुरु केला होता बिझनेस, आता 100 कोटींची आहे कंपनी
—————————————–
वय २७ वर्षे, हातात इंजिनिअरिंगची डिग्री आणि काही तरी हटके करण्याचा मानस. काहीशी अशी आहे आशीष बहुखंडी याची स्टोरी. इंजिनिअरींग पूर्ण केल्यावर एखाद्या मल्टिनॅशनल कंपनीत फॅट सॅलरीची नोकरी आशीष करु शकला असता. पण त्याला काही तरी वेगळे करायचे होते. कुटुंबाची मदत करण्यासह इतर लोकांनाही मदत करु शकले असे काही. त्यानंतर त्याने मोबाईल अॅप्स प्रमोशनचा बिझनेस सुरु केला. यासाठी ३० हजार रुपये भांडवल गुंतवले. आज त्यांची कंपनी अॅप्स डिस्कव्हर १०० कोटी रुपयांची कंपनी आहे. आता त्याची कंपनी केवळ भारतच नव्हे तर बाहेर सिंगापूर आणि इंडोनेशियातही काम करत आहे.

Ashish Bahukhandi.jpg
Ashish Bahukhandi.jpg

दिव्य मराठीशी बोलताना आशिषने सांगितले, की आम्ही सध्या इंडोनेशिअन मार्केटवर भर देतोय. त्या देशात कोट्यवधी रुपये गुंतवण्याची आमची योजना आहे. त्यातून मोठा नफा मिळेल असे वाटते.

>> काय करते अॅप्स डिस्कव्हर
अॅप्स डिस्कव्हर एक डिजिटल अॅण्ड नेटवर्क मार्केटिंग कंपनी असून मोबाईल अॅप्लिकेशन प्रमोशन करते. साध्या शब्दांत सांगायचे झाले, तर ही कंपनी ब्लॉग्ज आणि वेबसाईट्सवर मोबाईल अॅप्सची अॅड प्रोव्हाईड करते. एप्स डिस्कव्हर पर्सनल ब्लॉग लिहणाऱ्यांनाही अॅप्सची अॅड प्रोव्हाईड करते. यासाठी तुमचा ब्लॉग किंवा वेबसाईट किती पॉप्युलर आहे याचा काही संबंध नाही.

Ashish Bahukhandi.jpg
Ashish Bahukhandi.jpg

>> कोण आहे आशीष बहुखंडी
आशीषने करिअर इंन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड मॅनेजमेंटमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरींगची डिग्री घेतली आहे. त्यानंतर त्याने लगेच नोकरी केली नाही. एक वर्ष आयआयएमची तयारी केली. पण यात यश मिळाले नाही. त्याचे वडील रिटायर्ड गव्हर्नमेंट सर्व्हंट आहे तर आई होममेकर.

आशीषने सांगितले, की मला आयुष्यात काही तरी मोठे आणि दुसऱ्यांचे भले होईल असे काही करायचे होते. त्यामुळे मला माझे काही वेगळे तयार करायचे होते. जॉबच्या माध्यमातून मी केवळ फॅमिली आणि माझ्या गरजा पूर्ण करु शकलो असतो. याच विचारांसह मी माझे स्टार्टअप सुरु करण्याचा निर्णय घेतला.

>> अशी झाली सुरवात
त्याने सांगितले, की जेव्हा यासाठी विचार सुरु केला तेव्हा माझ्यासमोर अनेक ऑप्शन होते. पण काय करायचे हे पक्के करणे कठिण होते. पण त्यानंतर प्रदीर्घ रिसर्च केल्यावर आढळून आले की भारत आयडीत खुप प्रगती करत आहे. यातच काही करायला हवे. त्यातूनच काही तरी वेगळे करता येईल. त्याने ठरवले, की मोबाईल अॅप प्रमोशन बिझनेसमध्ये उतरायला हवे.

Ashish Bahukhandi.jpg
Ashish Bahukhandi.jpg

>> असा केला बिझनेस
सप्टेंबर २०१३ मध्ये केवळ ३० हजार रुपये गुंतवून अॅप्स डिस्कव्हरची सुरवात केली. सुरवातीला सगळे फ्रेशर्स हायर केले. अनुभवी कर्मचारी घेणे ऐपती पलिकडे आणि स्टार्टअपमध्ये येण्यास तयार नव्हते. पण जसा कंपनीचा रेव्हेन्यू वाढला तसे अनुभवी कर्मचारी कंपनीशी जुळू लागले. आज १० वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेले लोकही या कंपनीसोबत काम करत आहेत. पण तरीही कंपनीचा फोकस एरिया तरुण आहेत. त्यामुळे माझ्या कंपनीत जास्ती जास्त कर्मचारी २५ ते ३५ वयोगटातील आहेत. मी त्यांनी स्वतः ट्रेनिंग देतो.

>> कोण आहेत क्लायंट
अॅप डिस्कव्हरची पहिली डील न्युज हंटसोबत (आता डेली हंट) झाली होती. न्युज हंटला डेली हंट करण्यात आम्ही महत्त्वाची भूमिका बजावली. माझी कंपनी जेव्हा सुरवातीच्या स्टेजला होती तेव्हा न्युज हंटही सुरवातीच्या स्टेजला होती. आम्ही न्युज हंटला मोठ्या प्रमाणावर प्रमोट केले. दोन वर्षे ते आमचे क्लायंट होते. आज इंडोनेशिया, युसी ब्राऊझर, बायडू, अॅमेझॉन, स्नॅपडील, नेटवर्क १८, पेटीएम आमचे क्लायंट आहेत.

Ashish Bahukhandi.jpg
Ashish Bahukhandi.jpg

>> एवढे आहे टर्नओव्हर
सध्या अॅप्स डिस्कव्हरचे टर्नओव्हर ३० कोटी आहे तर बाजारमुल्य १०० कोटी. सध्या आम्ही कुणाकडूनही कोणत्याही स्वरुपात गुंतवणूक घेतली नाही. आम्ही प्रत्येक वर्षी पैसे वाचवतो. त्याची फेरगुंतवणूक करतो. अशा प्रकारे खर्च भागवतो. आम्ही प्रत्येक वर्षी ५० टक्के ग्रोथ करतोय. आता आम्ही गुंतवणुकदारांचा विचार करतोय.

>> हेही करतो आशीष
अॅप्स डिस्कव्हरसह आशीष आणखी काही बिझनेसही करतात. विद्या भारती एज्युकेशनल इंन्स्टिट्यूटच्या नावाने कोचिंग क्लासही तो चालवतो. यात ९ ते १२ क्लासच्या विद्यार्थ्यांना माफक दरात क्लासेस उपलब्ध करुन दिले आहेत. आमचे असे १० सेंटर आहेत.

Ashish Bahukhandi.jpg
Ashish Bahukhandi.jpg

Comments

comments