केसगळतीवर घरगुती रामबाण उपाय..!!

0
2644

केसगळतीवर घरगुती रामबाण उपाय..!!

लांबसडक आणि काळेभोर केस असावेत हे अनेक स्त्रियांना हवीहवीशी वाटणारी एक गोष्ट . मात्र मॉईश्चरची कमतरता, पोषणयुक्त आहाराची कमतरता आणि आधुनिक जीवनशैलीतील काही सवयी केसांचे आरोग्य खराब करतात. केसगळती रोखण्यासाठी टाळा या ‘7’ चुका म्हणजे ते  रफ, फ्रिजी तसेच निस्तेज दिसणार नाहीत. केस विंचरताना खूप केस गळत असल्यास हा नैसर्गिक घटकांनीयुक्त हेअर मास्क वापरल्यास केसगळती रोखण्यास मदत होते.

कसा बनवाल हा पॅक ?

 • एका वाटीमध्ये दोन चमचे आवळ्याची पूड घ्या.
 • आवळ्याच्या पावडरमध्ये दोन टेबलस्पून खोबरेल तेल मिसळून पेस्ट एकजीव करा.  जर खोबरेल तेल घट्ट झाले असल्यास गरम करून वितळून घ्या.
 • यामध्ये 1 टेबलस्पून एरंडेल तेल मिसळा.
 • त्यानंतर तयार मिश्रणात 4-5 थेंब रोझमेरी तेल मिसळा. आता हा तयार मास्क केसांवर लावा.

कसा लावाल हा पॅक :

 • ब्रशच्या सहाय्याने तयार पेस्ट डोक्याला लावा.
 • टाळूपासून केसांवर हा मास्क सर्वत्र नीट आणि एकसारखा लावावा.
 • 2 तासांसाठी हा मास्क केसांवर तसाच राहू द्या. त्यानंतर सौम्य शाम्पूने केस स्वच्छ धुवावेत.

फायदे :

 • आवळ्याची पावडर ‘व्हिटामिन सी’युक्त असल्याने केसांची वाढ सुधारण्यास मदत होते.
 • खोबरेल तेल टाळूवर खोल जाते. त्यामुळे केसांची शुष्कता कमी होते. परिणामी केसांचा पोत आणि चमक वाढते.
 • एरंडेल तेलामध्ये व्हिटामिन ई, ओमेगा 6 आणि ओमेगा 9 फॅटी अ‍ॅसिड मुबलक असल्याने केसगळती रोखण्यासोबतच दुतोंडी केसांची समस्यादेखील आटोक्यात राहण्यास मदत होते.
 • रोझमेरी ऑइलमुळे टाळूवरील रक्तप्रवाह सुधारतो. केसांची वाढ उत्तम होते.सोबतच केसांना नैसर्गिकरित्या चमक येते.

हा उपाय महिनाभर आठवड्यातून दोनदा केल्यास केसांच्या समस्या कमी होण्यास मदत होईल.