या पाच प्रकारे ओळखा..तुम्ही खरी अंडी खाता कि बनावटी 

0
2905

या पाच प्रकारे ओळखा..तुम्ही खरी अंडी खाता कि बनावटी

हिवाळ्यात अंडे खाणे हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मागच्या काही दिवसात अंड्यांची मागणी वाढल्याने अंड्यांच्या किमतीत वाद झाल्याचे वृत्त होते. किरकोळ बाजारांमध्ये अंड्यांची किंमत 7 रुपये प्रति अंडा अशी होती. तथापि, सध्या किमती खाली उतरल्या आहे. दरम्यान बाजारात बनावटी अंडी विकल्याचेही सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत हा प्रश्न उद्भवतो कि आपण भरपूर प्रोटीन घेण्याच्या नादात बनावटी अंडी तर खात नाही ना. काही काळापूर्वी आर्टिफिशियल अंडी (नकली अंडी) विकल्याने एका दुकानदाराला पोलिसांनी कोलकत्याहून अटक केले होते.

यामुळे, बनावट आणि खरी अंडी यातील फरक काय आहे हे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. वास्तविक आणि नकली अंड्यांमधील फरक आपल्याला स्पष्ट ओळखता यायला हवा. जर तुम्हाला हे माहिती असेल तर बाजारात तुम्हाला फसवले जाणार नाही. तसेच, दुकानदारांकडून नकली अंडी विकली जाण्याची तक्रारही आपण करू शकतो. सोबतच आपण नकली अंड्यांकडून शरीराचे होणारे नुकसानही टाळू शकतो.

आज आम्ही तूम्हाला काही गोष्टी सांगत आहोत ज्याद्व्यारे आपण बनावट आणि खरी अंडी कोणती हे सहजपणे ओळखू शकाल.

टरफल :

बनावटी अंड्यांचे टरफल जर तुम्ही आगीच्या संपर्कात आणले तर ते लवकर आग पकडतात, कारण ते प्लॅस्टिकसारख्या पदार्थापासून बनलेले असतात. खऱ्या अंड्याचे टरफल आग पकडत नाही याला आगीत टाकल्यावर ते काही वेळात काळे होऊन जातात.

चमकदार नसेल :

खऱ्या अंड्याची सगळ्यात पहिली ओळख म्हणजे ते जास्त चमकदार नसेल. मात्र बनावटी अंडी ही खूप चमकदार असतात बनावटी अंड्याचा रंग खऱ्या अंड्यांपेक्षा आपल्याला जास्त आकर्षित करतो.

गुळगुळीत पृष्ठभाग :

खऱ्या अंड्याच्या पृष्ठभागाला हात लावल्यावर आपल्याला गुळगुळीत वाटेल. मात्र बनावटी अंड्याचा पृष्ठभाग खऱ्या अंड्यापेक्षा रफ असेल. यात आपण हे नको विचार करायला कि खऱ्या अंड्याचा पृष्ठभाग रफ असतो.

आवाज :

खऱ्या आणि बनावटी अंड्याला ओळखण्यासाठी त्यांचा आवाजही महत्वपूर्ण आहे. जेव्हा आपण खऱ्या अंड्याला हातात घेऊन हलवलं तर त्यातून कोणताच आवाज येणार नाही. दुसरीकडे बनावटी अंडी हातात घेऊन हालवल्यावर त्यातून काहीतरी हलल्याचा आवाज येईल.

यॉक :


जेव्हा आपण खऱ्या अंड्यांची साल काढू तेव्हा त्यात यॉक वेगळं दिसून येईल. दुसरीकडे नकली अंड्यांचे साल काढल्यावर आपल्याला यॉक आणि व्हाइट फ्लूईड एकत्र असलेलं दिसेल. यावरून पण आपण खरे आणि बनावटी अंडी ओळखू शकू.