Aani Kay Hava | Official Trailer | Priya Bapat | Umesh Kamat

0
248
Aani Kay Hava
Aani Kay Hava

‘आणि काय हवाय’ एकदम साधी सोपी परंतु मनाला भिडणारी गोष्ट

१) या वेब या सीरिजमध्ये प्रियाने बापट जुई च्या तर उमेशने कामात साकेत ही व्यक्तीरेखा साकारली आहे.मराठी चित्रपटसृष्टीतील ‘छान कपल’ म्हणून ओळखली जाणारी जोडी म्हणजे अभिनेत्री प्रिया आणि उमेश.

२) ‘टाइम प्लीज’ या चित्रपटामुळे विशेष चर्चेत आलेली ही जोडी खुप दिवसानंतर पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येणार आहे.चित्रपट,मालिका, नाटक अशा विविध माध्यमांमधून चर्चेत असलेली ही जोडी आता पहिल्यांदाच एका वेब सीरिजमध्ये एकत्र काम करणार आहे. ‘आणि काय हवं?…’ अस त्यांच्या पहिल्या सीरिजचं नाव असून नुकताच या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

३) ‘आणि काय हवं?……’ या सीरिजच्या माध्यमातून उमेश पहिल्यांदाच वेब सीरिज च्या विश्वात पदार्पण करत आहे. तर प्रियाची ही दुसरी सीरिज आहे. ‘आणि काय हवं?…’ या सीरिजमध्ये प्रियाने बापट ने ‘जुई’ची तर उमेशने कामत ने ‘साकेत’ ही व्यक्तीरेखा साकारली आहे.

४) लग्नानंतर आयुष्यात होणारे काही बदल पती-पत्नी या नात्यामध्ये असलेलं प्रेम, मैत्रीचं नात यावर ही सीरिज भाष्य करणार असल्याचं एकंदरीतच प्रदर्शित झालेल्या या ट्रेलरमधून दिसून येत आहे.

५) या दरम्यान, प्रिया आणि उमेश त्यांच्या या आगामी वेब सिरीयल साठी प्रचंड उत्सुक असून त्यांनी यापूर्वीही या सीरिजचे काही पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर आता प्रियाने ट्विटरवरही या ट्रेलरचीही लिंक शेअर केली आहे. अद्याप या सीरिजविषयी फारशी माहिती समोर आलेली नाही. मात्र या सीरिजचं लेखन आणि दिग्दर्शन वरुण नार्वेकर यांनी केलं आहे.