मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय नाव सुबोध भावे

मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय नाव.सुबोधचा जन्म 9 नोव्हेंबर 1975 मध्ये पुण्याला झाला. त्याने आपलं ग्रॅजुएशन सिम्बॉसिस कॉलेजमध्ये पूर्ण केलं आणि आपल्या करियर ची सुरुवात इनिका टेकनॉलॉजी या कंपनीत सिल्समन म्हणून केली.

Loading...
Subodh Bhave - Being Marathi
Subodh Bhave – Being Marathi

सुबोधने 2005 मध्ये मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. सुबोध नेहमीच आपल्या कलाकृतीतून आव्हानात्मक आणि आपल्या चाहत्यांसाठी काहीतरी नवीन मेजवानी घेऊन येत असतो. त्यामध्ये 2011 मध्ये आलेला ‘बालगंधर्व’ या चित्रपटासाठी त्याला सर्वकृष्ट अभिनेता म्हणून झी गौरव पुरस्काराने गौरविण्यातही आले.

Loading...
Subodh Bhave - Being Marathi
Subodh Bhave – Being Marathi

त्यानंतर 2015 ‘लोकमान्य -एक योगपुरुष’ यामध्ये त्यांनी टिळकांची केलेली भूमिका दर्जेदार होती. तसेच या चित्रपटाला 52व्या महाराष्ट्र राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पाऊलवाट, भारतीय, अय्या, अनुमती,बालक-पालक हे सुबोधचे त्यानंतर आलेले सिनेमे.

Loading...
Subodh Bhave - Being Marathi
Subodh Bhave – Being Marathi

2015 मध्ये आलेल्या ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटात सुबोधने अभिनयाबरोबरच दिग्दर्शनातचा भारही हाती घेतला. यात त्याचे पात्र ‘सदाशिव’ नामक गायकाचे होते. तसेच हा सिनेमा मराठीतील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला.

Loading...
Subodh Bhave - Being Marathi
Subodh Bhave – Being Marathi

सुबोधने चित्रपटांबरोबरच ‘का रे दुरावा’,’मायलेक’, ‘कळत-नकळत’, ‘अवंतिक’,’या गोजिरवण्या घरात’,’आकाशझेप’ यांसारख्या मराठी मालिका आणि ‘आता दे टाळी’, ‘काळाया लागलायं जेंव्हा’, ‘मैतर’, ‘येळकोट’ यांसारखी नातकेसुद्धा त्याने केली. मराठी बरोबरचं त्याने ‘पिंनेयुम्म’ या मल्ल्याळम् या चित्रपटातही आपली कलाकारी दाखवली.

Subodh Bhave - Being Marathi
Subodh Bhave – Being Marathi

2017 मध्ये ‘फुगे’ या चित्रपटातील सुबोध व स्वप्नीलच्या जोडीला खूप पसंती मिळाली. तसेच यावर्षातील ‘हृदयांतर’ हा सुबोधचा गाजलेला चित्रपट.

Subodh Bhave - Being Marathi
Subodh Bhave – Being Marathi
Loading...
Loading...