मराठी सिने इंडस्ट्रीतील पडद्यावरील आणि पडद्यामागील खास मित्र…!!

मराठी इंडस्ट्रीतील पडद्यावरील अनेक कलाकारांची रिअल लाईफ मैत्री प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. अनेकांनी एकत्र पडद्यावर मित्राच्या भूमिका साकारल्या आहेतच सोबतच ते कलाकार प्रत्यक्ष आयुष्यातही तितकेच चांगले मित्र होते, आहेत. इंडस्ट्रीत मोठे कलाकार होण्याआधीपासून अनेकांनी एकत्र काम केले आहे आणि आज स्टार झाल्यानंतरही त्यांची मैत्री तशीच कायम आहे. काही मित्र सोडून गेलेत तरी त्यांच्या आठवणी कायम आहेत. अशाच काही मराठी कलाकार मित्रांच्या जोड्या.

Loading...

* लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन

Loading...

मराठी सिने इंडस्ट्रीतील या चारही सुपरस्टार कलाकारांनी मराठी सिनेसॄष्टीचा एक काळ गाजवला आहे. आजही त्यांचे सिनेमे आवडीने बघितले जातात. हे चारही कलाकार ऎकमेकांचे खूप चांगले मित्र म्हणूनही ओळखले जातात. कित्येक सिनेमांमध्ये त्यांनी एकत्र काम केले आहे. कित्येक सिनेमे त्यांनी एकत्र गाजवले आहेत. त्यांची मैत्री सिनेमातून आणि प्रत्यक्ष आयूष्यातही सर्वांनाचा प्रोत्साहन देणारी अशीच आहे. आज लक्ष्मीकांत बेर्डे हयात नसले तरी त्यांच्या आठवणींना उजाळा नेहमीच दिला जातो.

Loading...

*महेश कोठारे आणि लक्ष्या

Loading...

महेश कोठारेनी मराठी प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेता लक्ष्याला पहिल्या चित्रपटासाठी केवळ एक रुपया देऊन साइन केले. एवढेच नाही तर लक्ष्याने देखील महेश कोठारेची ऑफर आनंदाने स्वीकारली, आणि इथून सुरु झालेल्या मैत्रीने मराठी इंडस्ट्रीला रेकॉर्ड ब्रेक सुपरहिट फिल्म्स दिले. लक्ष्या अन महेश कोठाराची जोडी म्हणजे सुपरडुपर हिट अशीच होती. कित्येक सिनेमे त्यांनी एकत्र गाजवले आहेत. त्यांची मैत्री सिनेमातून आणि प्रत्यक्ष आयूष्यातही सर्वांनाचा प्रोत्साहन देणारी अशीच आहे. आज लक्ष्मीकांत बेर्डे हयात नसले तरी त्यांच्या आठवणींना उजाळा नेहमीच दिला जातो.

* भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव

bhart-siddharth

भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र मित्रांचं काम केलंय. दोघांचीही केमिस्ट्री अफलातून असून पडद्यावर आणि पडद्यामागेही हे दोघे चांगले मित्र आहेत. सिनेमात येण्याआधीपासून या जोडीने अनेक नाटकांमध्ये आपला जलवा दाखवला आहे.

* भरत जाधव, अंकुश चौधरी आणि केदार शिंदे

bharat-kedar-ankush

हे तिघेही कॉलेज जीवनापासून एकत्र काम करत असून अनेक एकांकीका आणि नाटकांचे प्रयोग यांनी एकत्र केले आहे. पुढे अनेक सिनेमांमध्येही हे एकत्र बघायला मिळाले आहेत. इंडस्ट्रीतील या तिघांची मैत्री चांगलीच प्रसिद्धही आहे.

* सिद्धार्थ जाधव-जितेंद्र जोशी

siddharth-jitendra

सिद्धार्थ जाधव आणि जितेंद्र जोशी यांचीही मैत्री चांगलीच लोकप्रिय आहे. दोघेही मराठीतील आघाडीचे अभिनेते असूनही कधीही या कलाकारांमध्ये वैर बघायला मिळत नाही. ऎकमेकांच्या सिनेमांची प्रशंसा करणे, त्या सिनेमाबद्दल दिलखुलास प्रतिक्रिया देणे हे सहजपणे मराठी इंडस्ट्रीत बघायला मिळतं.

* प्रसाद ओक आणि पुष्कर श्रोत्री

prasad-pushkar

प्रसाद ओक आणि पुष्कर श्रोत्री यांचीही पडद्यावरील आणि पडद्यामागची मैत्री चांगलीच लोकप्रिय आहे. अनेक सिनेमांमध्ये यांनी एकत्र काम केले आहे.

* सिद्धार्थ चांदेकर आणि हेमंत ढोमे

siddharth-hemant

सिद्धार्थ चांदेकर आणि हेमंत ढोमे हे दोघेही पुण्यातील अभिनेते ऎकमेकांचे चांगले मित्र आहेत. सिनेमांमध्ये एकत्र काम करण्याआधीपासून ते ऎकमेकांना चांगले ओळखतात.

Loading...
Loading...