आत्मा हरवलेला ‘देवा’

आत्मा हरवलेला ‘देवा’

काल २२ डिसेंबर रोजी ‘देवा एक अतरंगी’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. सध्या या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून एक वाद सुरु आहे. देवा चित्रपटाला सलमान खान चा चित्रपट टायगर जिंदा है मुळे प्राईम टाईम मध्ये चित्रपटगृहात शो दिला जात नव्हता. त्यामुळे एक मोठा वाद सुरु झाला आणि या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु झाली.तर पाहूया हा चित्रपट आपण चित्रपटगृहात जाऊन पाहण्यासारखा आहे का ?

Loading...

देवा हा चित्रपट मल्याळम चार्ली या चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे 2015 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला होता तर आता मराठी मध्ये त्याचा हा रीमेक होतो आहे. या चित्रपटाची स्टोरी बेतली आहे एका अतरंगी भन्नाट देवा व माया या कलाकारावर.माया ही एक यशस्वी लेखिका आहे. तिच्या पहिल्या पुस्तकाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. आता तिला दुसऱ्या पुस्तकाची ऑफर आहे, पण तिच्याकडे तसा विषय नाही. तो विषय शोधण्यासाठी ती कोकण गाठते. माणसांना भेटता भेटता सुचेल एखादी गोष्ट अशी तिची धारणा. याचवेळी कोकणात तिला राहण्यासाठी मिळतं देवाचं घर. हा देवा तिथे काही काळासाठी राहत असतो. त्या घरातल्या गोष्टी पाहून माया अवाक होते. त्याचवेळी तिच्या हाती एक चित्रकथा पडते. त्यातून तिची देवाबद्दलची उत्सुकता वाढते आणि या माणसाला शोधण्यासाठी ती एकेका माणसाला शोधत तिचा शोध सुरू होतो आणि त्या प्रत्येक माणसातून देवाचा नवा पैलू तिला दिसतो. तिचा शोध हाच या चित्रपटाचा प्रवास होतो.

Loading...

या चित्रपटात अंकुश चौधरी याने उत्तम अभिनय करून चित्रपटावर स्वताची छाप सोडली आहे तसेच तेजस्विनी पंडित, स्पृहा जोशी यांनी बऱ्यापैकी आपली व्यक्तिरेखा साकारली आहे. मोहन आगाशे, पंढरीनाथ कांबळे, वैभव मांगले यांच्या छोट्या व्यक्तिरेखा पण छान व्यक्तिरेखा जमल्या.रीमा लागू यांचा हा शेवटचा चित्रपट ठरला त्यांनीही छान अभिनय केला. या चित्रपटाचं कथानक, छायांकन, संगीत, संकलन या सर्व बाबी चांगल्या असल्या तरी सिनेमासाठी आवश्यक असलेला गाभा अर्थात पटकथा व्यवस्थित जमली नाही. हा चित्रपट तांत्रिकदृष्ट्या छान जमला आहे पण मुळ चित्रपटातील गाभा यात उतरला नसल्यने प्रेक्षकांना शेवटी आपलासा वाटत नाही.त्यांना मूळ चित्रपट चार्ली पहावा वाटतो.

Loading...
Loading...
Loading...