प्रेक्षकांना एकमेव आणि उत्तम पर्याय ‘बंदुक्या’

0
693
बंदुक्या - Being Marathi
बंदुक्या - Being Marathi

प्रेक्षकांना एकमेव आणि उत्तम पर्याय ‘बंदुक्या’

येत्या १ सप्टेंबर रोजी तब्बल चार महाराष्ट्र राज्य पुरस्कार विजेता “बंदूक्या” चित्रपट प्रदर्शित होतोय. या व्यतिरिक्त मराठीत एकही चित्रपट प्रदर्शित होत नाहीये, पण त्यानंतरच्या आठवड्यात ३ मराठी चित्रपट एकत्र प्रदर्शित होतायेत. “बंदूक्या” बरोबर प्रदर्शित न होण्याचा सकारात्मक निर्णय इतर निर्मात्यांनी घेतला असावा. खरंच जर अशा पद्धतीने मराठी चित्रपट सृष्टीत बदल घडले तर सर्वच निर्मात्यांना याचा फायदा होईल आणि एक उत्कृष्ट कलाकृती सर्वजण अनुभवू शकतील. एकाच वेळी ३-४ चित्रपट प्रदर्शित होतात तेव्हा कोणत्याही एका चित्रपटाला प्रेक्षक सर्वोतोपरी न्याय देण्यास असमर्थ ठरतात. मग यात प्रेक्षकांचीही चूक नसते. तेव्हा जर निर्मात्यांनीच पुढे येऊन अशा पद्धतीचे निर्णय एकमताने घेतले तर मराठी इंडस्ट्रीला लवकरच आणखीन चांगले दिवस येतील.

बंदुक्याच्या हटके जाहिराती, हटके मोशन पोस्टर, हटके सोशल मीडिया अपडेट्स या सर्व गोष्टी पहिल्या कि काहीतरी वेगळं करण्याचे धाडस निर्माता-दिग्दर्शकाने केले आहे हे लक्षात आल्या शिवाय राहत नाही.

गावरान बोलीभाषेचा खमंग तडका असलेली बंदूक्या चित्रपटाची स्टोरी प्रेक्षकांना काहीतरी भन्नाट देणार आहे असं वाटतय. शिव्या असूनही काहीतरी वेगळेपण जपल्यामुळेच उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट संवाद, उत्कृष्ट स्टोरी हे अवॉर्ड्स यंदा महाराष्ट्र राज्य शासनाकडून बंदूक्याला दिले गेले. चित्रपटाचा ट्रेलर पाहताना जुन्नर भागातील घाटावरची भाषा तुफान मनोरंजन करत पोट दुखेस्तोवर हसवते.

Watch OFFICIAL Trailer of Bandookay Marathi Movie 2017