लहानपणीची Girlfriend च झाली जीवनसाथी…!!

टीम इंडियाचा मिस्टर डिपेंडेबल म्हणून ओळखला जाणारा मराठमोळा अजिंक्य रहाणे हा त्याच्या अफलातून आणि संयमी बॅटींगसाठी ओळखला जातो. अजिंक्य रहाणेचं कौतुक त्याच्या नियमबद्ध बॅटींगसाठी केलं जातं.

Loading...

सचिननंतर त्याला चांगला बॅट्समन मानणारे अनेकजण आहेत. आज आम्ही त्याच्या क्रिकेटबद्दल नाहीतर त्याच्या पर्सनल लाईफबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.

Loading...

त्याची लव्हस्टोरी तुम्हाला सांगणार आहोत. अजिंक्य रहाणे याचं लव्ह मॅरेज झालं आहे. त्याने त्याच्या शेजारी राहणारी त्याची बालमैत्रीण राधिकासोबत लग्न केलं.

Loading...

अजिंक्य आणि राधिका धोपावकर हे शेजारी होते. दोघांमध्ये चांगली मैत्री होती. दोघांचे परिवार ऎकमेकांना ओळखत होते. दोघांचीही फॅमिली या दोघांच्या नात्याबद्दल जाणून होत्या. दोघांचं रिलेशनशीपही फार काळ लपू शकलं नाही.

Loading...

त्यानंतर दोघांच्या कुटुंबियांनी दोघांच्या लग्नाबाबत बोलणी केली. दोघांच्या परिवारांच्या सहमतीनुसार सप्टेंबर २०१४ मध्ये अजिंक्य रहाणे आणि राधिकाचं लव्ह-अरेंज मॅरेज झालं.

लग्नावेळी सोशल मीडीयात अजिंक्यणे राधिकाचा आपली बेस्ट फ्रेन्ड आणि वाईफ असा उल्लेख केला होता. राधिका अजिंक्यला प्रेमाने जिंक्स अशी हाक मारते.

आता तर हे नाव अजिंक्यच्या ड्रेसिंग रूमपर्यंत पोहोचलं आहे. टीममधील त्याचे मित्रही त्याला आता जिंक्स म्हणूनच बोलवतात.

अजिंक्यचे वडील हे बेस्टमध्ये काम करत होते तर राधिकाचे वडील हे मर्चंट नेव्हीमध्ये होते. २९ वर्षीय अजिंक्यचा जन्म ६ जून १९८८ मध्ये झाला असून त्याची पत्नी तीन वर्षांनी लहान आहे. राधिकाचा जन्म ११ एप्रिल १९९१ मध्ये झालाय.

Loading...
Loading...