विद्या बालन

0
648

विद्या बालन बॉलीवूड चित्रपटसृष्टीतील जगभर प्रसिद्ध असलेले नाव. विद्याचा जन्म 1 जानेवारी 1979 मध्ये मुंबईमध्ये झाला. तिला लहानपणापासूनच चित्रपटात काम करण्याची इच्छा होती आणि 1995 मध्ये पहिल्यांदा तिला ‘हम पाच’ या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्राची पदवी पूर्ण करण्याबरोबरच चित्रपट क्षेत्रात करियर सुरु करण्यासाठी तिने अनेक अयशस्वी प्रयत्न केले.

Vidya Balan - Being Marathi
Vidya Balan – Being Marathi

त्यानंतर तिने दूरदर्शनवरील खाजगी जाहिरात आणि मुजीक व्हिडिओ मध्ये काम केले. 2003 मध्ये बंगाली नाटक ‘भालो थेको’ या नातकाद्वारे तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. 2005 मध्ये परिणीता नाटकावर आधारित ‘परिणीता’ या चित्रपटात तिने मुख्य भूमिका केली आणि त्यात तिच्या अभिनयाची खूप प्रशांसाही करण्यात आली. तसेच 2006 च्या यशस्वी कॉमेडी फिल्म ‘लगे राहो मुन्नाभाई’ यातही तिनी मुख्य भूमिका साकारली. यात तिच्या संजय दत्त बरोबरच्या जोडीला फार पसंती मिळाली.

Vidya Balan - Being Marathi
Vidya Balan – Being Marathi

2007 मध्ये मानिरत्नम् यांच्या ‘गुरु’ या चित्रपटात विद्याने सहकलाकार म्हणून काम केले. मिथुन चक्रवर्ती, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या रॉय आणि आर माधवन यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर उत्कृष्ट कामगिरी केली. यानंतर 2007 मध्ये कॉमेडी चित्रपट ‘हे बेबी’ या चित्रपटात विद्याने आईची भूमिका केली. त्यांनतर ती मल्यालम् चित्रपटाचा हिंदी रिमेक ‘भूल भुल्लैया’ या चित्रपटात अक्षय कुमार बरोबर दिसली. 2008 मध्ये ‘किस्मत कनेक्शन’ या चित्रपटात तिने शाहिद कपूर बरोबर काम केलं.

Vidya Balan - Being Marathi
Vidya Balan – Being Marathi

2009 पर्यंत विद्याने स्वतःला हिंदी चित्रपटात एक अग्रगण्य स्थान मिळवून दिले होते. याच वर्षी आर. बाल्की दिग्दर्शित ‘पा’ या चित्रपटात विद्याने अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका केली, या चित्रपटाच्या यशाने तिच्या करियरला एक वेगळे वळण दिले. या चित्रपटामुळे तिला अनेक पुरस्कार मिळाले. नंतर 2010 मध्ये इश्किया या चित्रपटात तिने नसीरउद्दीन शाह आणि अरशद वारसी यांच्याबरोबर काम केलं आणि याही चित्रपटाने यशाचे शिखर गाठले.

Vidya Balan - Being Marathi
Vidya Balan – Being Marathi

2011 मध्ये विद्याने ‘नो वन किल जसिका’ या रहस्यमय चित्रपटात राणी मुखर्जी सोबत काम केले. यानंतर ती एकता कपूर दिग्दर्शित ‘द डर्टी पिचर’ या चित्रपटात दिसली. यासाठी तिने 12 किलो वजन वाढवले होते.

Vidya Balan - Being Marathi
Vidya Balan – Being Marathi

कहाणी, हमारी अधुरी कहाणी, घनचक्कर, शादी के साइड इफेक्ट, बॉबी जासुस, बेगम जान हे तिचे यानंतरचे चित्रपट. तसेच ती ‘एक अलबेल’ या मराठी चित्रपटातही दिसून आली. तिचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट म्हणजे ‘तुम्हारी सुलु’ यात विद्याच्या अभिनयाला खूप पसंती मिळाली आणि अजून एका चित्रपटाने विद्याच्या यशस्वी चित्रपटाच्या यादीत आपली जागा बनवली.

Vidya Balan - Being Marathi
Vidya Balan – Being Marathi

विद्याला आजवर नॅशनल फिल्म अवॉर्ड, पाच फिल्म फेअर, सहा स्क्रीन अवॉर्ड. तसेच 2014 मध्ये तिला भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.

Vidya Balan - Being Marathi
Vidya Balan – Being Marathi

Rupal Deshmukh

Vidya Balan - Being Marathi
Vidya Balan – Being Marathi

Vidya Balan - Being Marathi
Vidya Balan – Being Marathi

Vidya Balan - Being Marathi
Vidya Balan – Being Marathi
Vidya Balan - Being Marathi
Vidya Balan – Being Marathi
Vidya Balan - Being Marathi
Vidya Balan – Being Marathi

Vidya Balan - Being Marathi
Vidya Balan – Being Marathi