एन. आर. नारायण मूर्ति

0
1206
Infosys Narayana Murthy - Being Marathi
Infosys Narayana Murthy - Being Marathi

‘Our assets Walk Out of the door every morning. We have to make sure that they come back the next morning’. याचा मराठी अर्थ असा होतो की, ‘तुमची संपत्ती रोज संध्याकाळी दरवाजाबाहेर जात असते, दुसऱ्या दिवशी सकाळी ती परत येण्याची काळजी घेणे ही तुमची जबाबदारी आहे.’ इथे संपत्ती याचा अर्थ पैसा नव्हे तर तुमच्या कंपनीत काम करणारी माणसं. जी खऱ्या अर्थाने तुमची संपत्ती आहे. ती तुमच्याकडे नेहमी राहिली पाहिजे. हे महान विचार आहेत, प्रसिद्ध उद्योजक नारायण मूर्ती यांचे. या विचारावरूनच त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाची कल्पना यावी. त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने या व्यक्तित्वाबद्दल थोडे जाणून घेऊया.

Narayana Murthy NM - Being Marathi
Narayana Murthy NM – Being Marathi

२० ऑगस्ट १९४६ साली नारायण मूर्ती यांचा जन्म कर्नाटक राज्यातील कोलर जिल्ह्यामधील सिद्लाघत्ता या गावात झाला. त्यांचे संपूर्ण नाव नागवार रामाराव नारायण मूर्ती. प्राथमिक शिक्षणानंतर त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरींग मधून १९६७ साली डिग्री मिळवली. १९६९ मध्ये त्यांनी कानपूरच्या ‘इंडीयन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी’ या संस्थेमधून ‘मास्टर’ डिग्री मिळवली. आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही त्यांनी शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले.

Narayana Murthy Old Photo - Being Marathi
Narayana Murthy Old Photo – Being Marathi

नारायण मूर्ती यांनी आपल्या करिअरची सुरूवात अहमदाबादमध्ये आयआयएमचे चीफ सिस्टम प्रोग्रामर म्हणून केली. त्यानंतर त्यांनी सॉफ्ट्रोनिक नावाची एक कंपनी सुरू केली पण दीड वर्षातच ही कंपनी बंद पडली. मग ते पुण्यातील पटनी कम्प्युटरमध्ये नोकरीस लागले.

Narayana Murthy - Being Marathi
Narayana Murthy – Being Marathi

१९८१ साली नारायण मूर्ती आणि त्यांच्या सहा सहकाऱ्यांनी मिळून ‘इन्फोसिस’ची स्थापना केली. त्यावेळी त्यांना लागणारे भांडवल त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांनी दिले. १९८१ ते २००२ पर्यंत कंपनीच्या सीईओ पदावर कार्यभार सांभाळल्यानंतर त्यांनी नंदन निलकेणी यांना आपला उत्तराधिकारी नेमले. आपल्या कार्यकाळात त्यांनी ‘इन्फोसिस’ ला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. भारतीय माहिती तंत्रज्ञान (आय.टी) क्षेत्राच्या विकासासाठी वैश्विक स्तरावर चालणाऱ्या मॉडेल्सची निर्मिती त्यांच्या कार्यकाळात करण्यात आली. २००२ ते २००६ पर्यंत ते बोर्ड चेअरमनपदी होते. त्यानंतर ते मुख्य सल्लागार समितीचेही चेअरमन होते. २०११ साली त्यांनी कंपनीतून निवृत्ती घेतली.

infosys-founder-nrmurthy - Being Marathi
infosys-founder-nrmurthy – Being Marathi

याशिवाय एचएसबीसी कॉर्पोरेट बोर्ड, डीबीएस बँक, युनिलिवर, आयसीआयसीआय आणि एनडीटीव्ही साठीही त्यांनी संचालक म्हणून काम पाहिले. त्याचप्रमाणे अनेक शिक्षण व समाजसेवी संस्थांच्या सल्लागार समितीचे ते सदस्य आहेत. ‘इन्फोसिस फाऊंडेशन’ च्या माध्यमातून त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती या समाजसेवा करीत आहेत. भारत सरकारच्या पब्लिक हेल्थ फाऊंडेशनचे ते चेअरमन आहेत. ब्रिटीश टेलिकम्युनिकेशनची आशिया खंडामध्ये जी सल्लागार समिती आहे, तिचे नारायण मूर्ती हे प्रमुख सल्लागार आहेत.

Infosys CEO Vishal Sikka. Express archive photo.
Infosys CEO Vishal Sikka. Express archive photo.

२०१३ साली नारायण मूर्ती पुन्हा इन्फोसिसमध्ये आले. ऑक्टोबर २०१४ पर्यंत कंपनीची सेवा केल्यानंतर त्यांनी या कंपनीतून कायमची निवृत्ती घेतली. आपल्या कामामुळे त्यांना अनेक मानसन्मान मिळाले. भारत सरकारने त्यांना २००० साली पद्मश्री, २००८ साली पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले.

Narayan Murthy award - Being India
Narayan Murthy award – Being India

नारायण मूर्तींची वाटचाल अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांना इन्फोसिसच्या माध्यमातून जे काही कमावले, ती सगळी कमाई त्यांनी परत कंपनीलाच दान दिली. जे काही मिळवले ते समाजामधून आणि ते समाजालाच परत करण्याचा मनाचा मोठपणा दाखवणारे नारायण मूर्ती हे अनेकांसाठी प्रेरणास्थान आहेत. संपूर्ण जगाला आपल्या विचारांनी आणि कार्याने दिशा देणारे नारायण मूर्ती हे आपल्या भारताचा मानबिंदू आहेत.

Infosys - Being Marathi
Infosys – Being Marathi