इस्राएलबद्दल तुम्हाला माहीत नसलेल्या गोष्टी ?

0
5158
Benjamin Netanyahu
Benjamin Netanyahu

सन १९४८ पुर्वी पेलस्टाईन हा प्रदेश ब्रिटीश राजसत्तेखाली होता. या प्रदेशात प्रामुख्याने अरबी आणि यहुदी (ज्यु) लोक वास्तव्य करत.परंतु यहुदी (ज्यु ) लोक पेलस्टाईनमधून स्वतंत्र्य राष्ट्र निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील होते.याचाच परिणाम १९४७ साली अरबी आणि ज्यु यांच्यात संघर्षास प्रारंभ होऊन १४ मे १९४८ साली ईस्राईल या नव्या राष्ट्राचा उदय झाला. इस्राईल देश नैऋत्य आशियात भूमध्य समुद्रालगत वसला आहे. इस्राईलची लोकसंख्या सात(७ ) कोटी असून हे लोक अत्यंत राष्ट्रप्रेमी आहेत. या देशात ज्यु लोक बहुसंख्यांक आहेत.


इस्राईलमध्ये प्रभूसत्तासंपन्न गणराज्य आहे. इस्राईलमध्ये एक सदनीय संसद आसून तिच्यामध्ये १२० सदस्य आहेत. ही संसद देशातील सर्वोच्च अधिकार प्राप्त करते.या सदस्यांचा सदस्यत्वाचा कालावधी चार वर्षाचा आहे. या देशात राष्ट्रपती हे राष्ट्रप्रमुख आहेत. संसद त्यांची पाचवर्षासाठी निवड करते.पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली एक मंत्रीमंडळ संसदेला जबाबदार असते.या मंत्र्याची निवड संसद सदस्यातुन तसेच बाहेरील व्यक्तीचीही करता येते. तसेच या देशात स्थानिक संस्थाच्या निवडणूका दर चार वर्षानंतर होतात. सध्या २७ नगर पालिका ,११७ स्थानिक परिषदा,४७ क्षेत्रिय परिषदा आणि ६७४ गावे स्थानिक प्रशासनार्तगत कार्य करतात.

Benjamin Netanyahu
Benjamin Netanyahu

इस्राईलमध्ये विविधता आहे. या देशात ज्यु लोकांचे प्रमाण सर्वाधिक असुनही या देशात विविधता टिकून आहे. या देशात जगातील सर्व ज्यु लोकांना राहण्यासाठी परवानगी आहे. त्यामुळे येथे येणारे लोक आपल्या परंपरा,रीतीरिवाज, रूढी पाळतात त्यामुळे या देशात विविधता निर्माण झाली आहे. इस्राईलने आरोग्य, शिक्षण,आणि लोकांनच्या राहणीमानात मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे.इस्राईलचा मानव विकास निर्देशांक अति उच्च आहे.(०.८९९ )

Israel Flag
Israel Flag

इस्राईलमधील भौगोलिक हवामान शेतीसाठी पूरक नाही. कारण या देशात पर्जण्यमाण कमी असल्यामुळे जलसिंचनाच्या सुविधा ही कमी आहेत. या भागातील जमीन रेतीमय (वाळवंटी ) आहे. इत्यादी अडचणी असूनही शेतीचा विकास विविध तंत्रज्ञानाचा वापर करून झाला आहे.इस्राईलमध्ये दोन प्रकारची शेती केली जाते. किबुत्स आणि मोशाव .किबुत्स शेतीप्रकारामध्ये लोकांचे गट एकत्रित येऊन सरकारची जमीन करतात.( कसतात ) येथील सरकारही या लोकांना मदत करते.तसेच मोशाव शेतीप्रकारामध्ये लहान आकाराचे शेतकरी एकत्रित येऊन सहकारी तत्त्वावर शेती.करतात.

&nbsp

सध्या देशाच्या जी.डी.पी.मध्ये शेती क्षेत्राचा वाटा २.५% तर निर्यातीत ३.६% आहे. तसेच औद्योगिक क्षेत्राचा ३१% वाटा जी.ड.पी मध्ये आहे. तर सेवा क्षेत्राचा ६४% यात प्रामुख्याने औषधी उपकरणे, पेट्रोलियम कारखाने, प्लास्टिक उद्योग,रासायनिक उद्योग आणि हिऱ्याना पैलू पाडणे तसेच पाँलिसिंग करणे हे महत्वाचे उद्योग आहेत.

Israel Institude Of Technion
Israel Institude Of Technion

इस्राईलने शैक्षणिक आणि उच्च तंत्रज्ञानात चांगले संशोधन केले आहे. इस्राईलमधील ९७% जनता साक्षर आहे. इस्राईलची राजधानी जेरुसलेमध्ये हिब्रु विद्यापीठ तसेच हैफा मध्ये Israel Institute of Technology हे सगळ्यात जुने विद्यापीठ आहे.
इस्राईलमधील अंतर्गत सुरक्षा यंत्रणा अत्यंत प्रभावी आहे. त्यामध्ये इस्राईल पोलीस, सिविल गार्ड आणि बार्डर पोलीस तसेच त्यांची गुप्तचार यंत्रणाही सक्षम आहे.

israel - Being Marathi
israel – Being Marathi

इस्राईलमध्ये पर्यटन व्यवसायही आहे. या देशाला सरासरी ३-४ मिलियन परदेशी पर्यटक भेट देतात. खास करुन येथील शेतीमधील विविध प्रयोग पाहण्यासाठी भेटी देतात.
भारत आणि इस्राईल मध्ये १९९२ पर्यंत कोणत्याही प्रकारेचे राजनैतिक संबंध नव्हते. सध्या रशियानंतर इस्राईल लष्करी साहय्य आणि निर्यातीत दुसऱ्या क्रमांक वर आहे. आतापर्यंत भारत आणि इस्राईलने भारतातील इस्त्रोच्या माध्यमातून ८ सैनिकी उपग्रह प्रक्षेपित केले आहेत.

Panorama of Jerusalem old city. Israel
Panorama of Jerusalem old city. Israel

इस्राईलमध्ये काही समस्या आहेत. पेलस्टाईन सोबतचा संघर्ष ही सगळ्यात महत्वाची समस्या आहे. या देशांमध्ये सिमावाद, सुरक्षा, पाणी विवाद तसेच परस्परांचा व्देष यातून सतत संघर्ष होत राहतो. या कारणांमुळे येथील लोकांनी काही प्रमाणात दुसऱ्या देशांमध्ये स्थलांतर केले आहे. या देशात आर्थिक आणि परदेशी गुंतवणूकी बाबतीत समस्या आहेत.
इस्राईल देश चिमुकला असूनही यांने विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे.

Israel Agriculture
Israel Agriculture