स्वावलंबी व्यक्तिमत्व श्री.नारायण माने

0
758

स्वावलंबी व्यक्तिमत्व श्री.नारायण माने वय 80 च्या पुढे, राहणार अहमदनगर.
ह्या माणसाची एवढी ओळख सांगितली तर फार काही विशेष नाहीये.

पण नगरकरांना त्यांचा आवाज परिचित आहे.
” आ…..लेपाक,
सर्दीला, खोकल्याला, पडशाला ,
पित्ताला आ….लेपाक” अशी टिपिकल सुरात हाळी देत हेआजोबा अतिशय गुणकारी अश्या आल्याच्या वड्या पायी फिरत विकतात.
आणि हे काम 1956 पासून 2017 पर्यंत अविरत चालुय.
होय तब्बल साठ वर्ष हा माणूस रोज संध्याकाळी घरी तयार केलेल्या वड्या घेऊन निघतो, जुन्या शहरात प्रमुख रस्त्यावर फिरत आलेपाक विकतो.
वार्धक्य,डोळ्यावर आलेला चष्मा ,

रॉकेलच्या चिमणी ऐवजी गॅसबत्ती ह्यापलीकडे काहीही बदल नाहीये.पूर्वी आळंदी पंढरपूर सांगली अश्या भागात आल्याची वडी विकल्यावर अहमदनगर शी असलेलं नात त्याची ओढ परत त्यांना या शहरात घेऊन आली.

बाबांना विचारलं आता एवढं वय झालं तर कशाला काम करता?बाबानी उत्तर दिल, ” पोरा, आता कष्टाची सवय झालीय अंगाला, संध्याकाळी हाळी देत फिरलो नाही तर घासघशाखाली उतरत नाही “साठ वर्ष अविरत कष्ट पाहिले कि मी अमुक वर्ष नोकरी करतोय काम करतोय हा आपला अहंकार गळून पडेल.बाबा तुम्हाला या वयात हे काम करून काय मिळणार आहे फारतर फार तुम्हाला 100-200 रुपये मिळतील अस बोलल्यावर ते बोलले बाळा मला ह्या पैश्याची जास्त गरज नाही पण आत्ताच्या काळात पण ह्या गोळ्या औषधाच्या जगात जेव्हा लोक मला आल्याच्या वाडी साठी जेव्हा पूर्ण शहरात शोधत असतात तेव्हा भेटल्यावर त्यांच्या चेहर्या वरचा आनंद पाहण्यासाठी मी हे करतो. ते जेव्हा आल्याच्या वाडीचा त्यांना झालेला फरक सांगत असताना जेवढा आंनद होतो तो या पैश्यापेक्षा जास्त असतो बाळा.

हे ऐकल्यावर मी एकदम स्तब्ध झालो . मग त्यांनी मला आवाज देऊन आल्याची वाडी माझ्या तोंडात भरवली . कापड बाजारात मी फिरत असताना सहज काढलेला हा फोटो जेव्हा त्यांना दाखवला त्यांना फोटो खूप आवडला व परत त्यांनी मला एक वाडी च पाकीट दिल व म्हणाले हे घे तुझं बक्षीस घरी सगळ्यांना खाऊ घाल व काम करायला कधी लाजू नकोस. अनेक पिढ्या बाबांची प्रसिद्ध हाळी ऐकत मोठी झालीय,आणि अजूनही प्रवास थांबलेला नाहीये.
60 वर्ष सलग काम ,
सलाम !!

मी अहमदनगरकर – MH16
sorce – https://goo.gl/h87quG