रसिका धबडगावकर

0
821
रसिका धबडगावकर
रसिका धबडगावकर

माझ्या नवऱ्याची बायको : शनाया

शनाया हे नाव आज सगळ्यांनाच माहिती आहे. रसिका सुनील पूर्ण नाव रसिका धबडगावकर. रसिकाचा जन्म 3 ऑगस्टला विदर्भातील अकोला येथे झाला. तिनी आपले 11 वी आणि 12 वी चे शिक्षण डोंबिवलीतील पेंढारकर कॉलेजमधून पूर्ण केले. तसेच तिनी ठाण्यातील जोशी-बेडेकर कॉलेजमधून मास मीडियातून ग्रॅजुएशन केले. तिला खाली वेळात मराठी कविता करायला आवडतात. तसेच ती सोशल मीडियावर सुद्धा खूप ऍक्टिव असते. तिच्या आवडीच्या नायिका म्हणज दीपिका पदुकोण आणि मुक्ता बर्वे. रसिकाची आई मनीषा या सुद्धा नायिका आहेत आणि तिचे वडील हे सीए असून ते परदेशात काम करतात.

करियर :

रसिका धबडगावकर
रसिका धबडगावकर

शाळेत असतांना रसिका अनेक नाटकांमध्ये भाग घायची. महाविद्यालयात अनेक नाटकांमध्ये काम केल्यावर ऍक्टिंग तिची आवड बनली. तिनी आपले ऍक्टिंग करियर युथ फेस्टिवल आणि राज्य नाट्य स्पर्धा यामधून सुरु केले. तिच्या आईला वाटायचं तिनी संगीत शिकावं त्यामुळे ती 7 पेक्षा अधिक वर्ष शास्त्रीय संगीत शिकली व तिने आपले संगीत विशारद पूर्ण केले.

तिला अभिनयाबरोबरच संगीतही आवडतं. तिने अजय अतुल यांच्या बरोबर अनेक थेट मैफिली तसेच अजिंठासाठी पार्श्वगायनही केले आहे. अभिनय आणि संगीत यामध्ये होणाऱ्या गोंधळामुळे तिने अभिनयाकडे लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले.

52व्या नाट्य स्पर्धेमध्ये तिचे नाटक लव आज कल याला पाहिले पारितोषिक मिळाले. त्यानंतर तिने ‘लक्स झक्कास होरॉईन’ मध्ये भाग घेऊन पहिल्यांदा टीव्ही कॅमेरा फेस केला. त्यांनतर 2016 मध्ये माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत प्रमुख नायिका म्हणून तिला काम मिळाले.

चित्रपट :

रसिका धबडगावकर
रसिका धबडगावकर

नुकतीच ती पोस्टर बॉइज या चित्रपटातील लावणी मध्ये दिसली तसेच या वर्षी तिचे ‘बस स्टॉप’ आणि ‘बघतोस काय मुजरा कर’ हे चित्रपट प्रदर्शित झाले.

रसिका धबडगावकर
रसिका धबडगावकर

रसिका धबडगावकर
रसिका धबडगावकर
रसिका धबडगावकर
रसिका धबडगावकर