सोनाली बेंद्रे

0
792

सोनाली बेंद्रे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेली अभिनेत्री. सोनलीचा जन्म 1 जानेवारी 1975 मध्ये मुंबईला झाला. सोनालीचे शिक्षण केंद्रीय विद्यालय मल्लेश्वर बंगळुरू आणि हॉली क्रॉस कॉन्व्हेंट हायस्कुल, ठाणे येथे झाले. त्यानंतर ती वेल्हाम गल्स हायस्कुल, डेहराडून येथे गेली.

Sonali Bendre - Being Marathi
Sonali Bendre – Being Marathi

करियर :

स्टार डस्ट टेलेन्ट सर्च साठी निवडण्याआधी मॉडेल म्हणून तिने आपल्या करियरची सुरवात केली. मुंबईत आल्यावर तिने भारतीय चित्रपटसृष्टीतील विविध कलाकारांकडून प्रशिक्षण घेतले. गोविंदासोबतच्या ‘आग’ (1994) या चित्रपटातून सोनालीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. चित्रपट फ्लॉप झाला मात्र सोनालीला खूप ओळखले गेले आणि त्यावर्षी तिला फिल्म फेअर फॉर न्यू फेस आणि स्टार स्क्रीन पुरस्काराने गौरविण्यात आले.

Sonali Bendre - Being Marathi
Sonali Bendre – Being Marathi

सुरवातीला एक यशस्वी अभिनेत्री बनण्यासाठी तिला खूप संघर्ष करावा लागला. त्यानंतर 1996 मध्ये आलेल्या ‘दिलजले’ या चित्रपटातील अभिनयासाठी समीक्षकांनी तिची प्रशंसाही केली. त्यानंतर भाई (1997), सर्फरोष, जख्म, डुब्लिकेट, हम साथ साथ है (1999), तेरा मेरा साथ रहे (2001) या चित्रपटांमध्ये तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली.

Sonali Bendre - Being Marathi
Sonali Bendre – Being Marathi

चारही खान (सलमान, शाहरुख, आमिर, सैफ) यांच्यासोबत काम करणाऱ्या अभिनेत्रींपैकी ती एक म्हणून ओळखली जाते. तिने अजय देवगण, अक्षय कुमार, सुनील शेट्टी या बॉलीवूड कालाकारांबरोबरही काम केले आहे. तसेच तेलगू मँटीनी आइडल चिरंजीव यांच्यासोबत तिने इंद्र अँड शंकरदादा एम बी बी एस या चित्रपटात काम केले.

Sonali Bendre - Being Marathi
Sonali Bendre – Being Marathi

अभिनयाबरोबरच गद्दार, सपुत, बॉम्बे, लज्जा आणि मेजर साहब यांसारख्या चित्रपटांमधून तिला एक उत्कृष्ट डान्सर म्हणूनही ओळखले जाऊ लागले. 2003 मध्ये आलेल्या ‘कल हो ना हो’ या चित्रपटात शाहरुख खानच्या डॉक्टररांची भूमिका तिने केली. 1 नोव्हेंबर 1996 मध्ये तिने पारंपरिक महाराष्ट्रीयन साडीमध्ये भारतात मायकल जॅकसनचे स्वागत केले.

Sonali Bendre - Being Marathi
Sonali Bendre – Being Marathi

12 नोव्हेंबर 2002 मध्ये तिने सिने दिग्दर्शक गोल्डी भेल यांच्याशी विवाह केला. 11 ऑगस्ट 2005 मध्ये तिने एका मुलाला जन्म दिला.

अभिनयाबरोबरच तिने टेलिव्हिजनवरील क्या मस्ती क्या धूम….। हा कार्यक्रम होस्ट केला. तसेच सोनी टीव्ही वरील इंडियन आयडल शोची ती जज होती. तसेच 26 फेब्रुवारी 2005 च्या 50 व्या फिल्म फेअर अवॉर्ड मध्ये तिने सैफ आणि फरीदा जलाल यांच्याबरोबर तिने कार्यक्रमाचे संचालन केले. त्यानंतर मिस्टर अँड मिसेस टेलिव्हिजन, इंडियन आयडल 4, इडियाज गॉट टॅलेंट आणि 2012 मध्ये कोरियोग्राफर टेरेन्स लुइससह तिने जजची भूमिका साकारली.

Rupal Deshmukh

Sonali Bendre - Being Marathi
Sonali Bendre – Being Marathi
Sonali Bendre - Being Marathi
Sonali Bendre – Being Marathi
Sonali Bendre - Being Marathi
Sonali Bendre – Being Marathi
Sonali Bendre - Being Marathi
Sonali Bendre – Being Marathi
Sonali Bendre - Being Marathi
Sonali Bendre – Being Marathi