भजन कीर्तनातून दूर होऊ शकतो तणाव….

0
649

भजन कीर्तनातून दूर होऊ शकतो तणाव….

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या संस्कृत अध्ययन विभागाने एका अभ्यासातून दावा केला आहे की, मुलांना दिलेले संस्कार आणि भजन कीर्तनातुन तणावासह मेंदूशी निगडित अडचणी दूर करता येते. हा पर्याय औषधांपेक्षा उत्तम आहे, कारण मानोपचार  आणि औषधीमुळे रुग्णांची स्थिति अधिकच बिघडत आहे. लहान वयातच भजन-कीर्तन ऐकणे हे स्ट्रेस बस्टर च्या रुपात काम करत असतात.

DNA मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीमध्ये, जेएनयू तील वैदिकशास्त्राचे प्राध्यापक सुधीर कुमार आर्य म्हणाले की, या प्रकारचे संशोधन पहिल्यांदाच केले गेले आहे. त्यांनी म्हंटलं की, भागवत पुराण आणि अग्नी पुराण यावर आधारित अभ्यासक्रमात हे स्पष्ट झाले आहे की प्रारंभिक अवस्थेत शिकवण्यात आलेल्या नैतिक मूल्यांमुळे चिंता, नैराश्य किंवा इतर मानसिक समस्यांशी सामना करावा लागणार नाही.

योग सुद्धा या समस्येसाठी लढण्यात खूप मददगार ठरू शकतो. संशोधनात असे म्हंटले आहे की न्यूक्लियर फॅमिली आणि कुटुंबात एकच मुलगा असण्याची संकल्पना युवकांमध्ये तणावाचे कारण बनत आहे. या समस्येवर आधारित वैद्यकीय उपचारामुळे फक्त शारीरिक समस्यांचा उपचार केला जाऊ शकतो, मानसिक समस्यांचा नाही.

संशोधन करणाऱ्या नंदिनी दास म्हणतात की, यासारखी समस्या जुन्या काळापेक्षा आधुनिक काळात जास्त पाहायला मिळत आहे. आपण सामान्यतः मेंदूशी संबंधित समस्यांना परदेशी संकल्पना म्हणून मानतो, परंतु आपल्या पुरं आणि वेदांमध्ये सुद्धा याचा तापशिल आढळतो. तसेच भजन कीर्तन केल्याने स्ट्रेस सारखा आजार होत नाही. स्ट्रेस मधून वाचण्यासाठी  याला लहानपणापासूनच आपल्या जीवनशैलीचा भाग बनवला गेला पाहिजे.