ही आहेत भारतातील सर्वाधिक पगार देणारी ५ क्षेत्रे…!!

0
1940

ही आहेत भारतातील सर्वाधिक पगार देणारी ५ क्षेत्रे शिक्षणाबरोबरच इतर कौशल्येही आवश्यक आयुष्यात कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही. श्रीमंतीच्या बाबतीत बोलायचे झाले तर त्यासाठी तुम्हाला तोंडात चांदीचा चमचा घेऊन यावे लागते, नाहीतर कष्ट करुन श्रीमंती मिळवावी लागते. मात्र प्रत्येकजण श्रीमंत घरात जन्माला येत नाही. बहुतांश जणांना श्रीमंत होण्यासाठी कष्टानेच पैसा कमवावा लागतो. जास्त पगाराची नोकरी मिळविणे हे खऱ्या अर्थाने आव्हान आहे. त्यासाठी तुम्हाला शैक्षणिक ज्ञानाबरोबरच इतरही अनेक कौशल्यं येणे गरजेचे असते. त्यासाठी शॉर्टकट नाही, त्यामुळे भारतात कोणते क्षेत्र निवडल्यास तुम्हाला सर्वाधिक पगार मिळेल असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर ही सर्वाधिक महत्त्वाची ५ क्षेत्रे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

१. व्यवस्थापन (मॅनेजमेंट) हे क्षेत्र म्हणजे सर्व संस्थांचा आत्मा असतो. संस्थेतील विशिष्ट विभागाचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करणे हे या लोकांचे काम असते. या क्षेत्रात प्रवेश करताना तुम्ही मेहनती असणे आवश्यक असते. सुरुवातीचा टप्पा पार केल्यानंतर तुम्हाला मागे वळून पाहण्याची आवश्यकताच राहत नाही. या क्षेत्रात अनुभव असणारे लोक जास्त पगाराची मागणी करु शकतात. वार्षिक पॅकेज सुरुवात – ३ लाख करिअरच्या मध्यावर – २० ते २५ लाख शेवटच्या अनुभवी टप्प्यात – ७० ते ८० लाख

२. चार्टर्ड अकाऊंटंट चार्टर्ड अकाऊंटंटची बिझनेस आणि अकाऊंटन्सी विषयावर कमांड असणे आवश्यक असते. या प्रोफेशनमध्ये तुमच्याकडे शिक्षणाशिवाय इतरही कौशल्यं असणे गरजेचे असते. भारतातील आदर दिल्या जाणाऱ्या प्रोफेशनपैकी एक असे हे प्रोफेशन आहे. सुरुवात – ५ लाख करिअरच्या मध्यावर – १० ते १२ लाख शेवटच्या अनुभवी टप्प्यात – २५ ते ३० लाख

३. गुंतवणूक करणारे बँकर्स कंपनीसाठी भांडवल उभे करणारे आणि कंपनीला अर्थिक विषयातील सल्ला देणारे अशी या लोकांची ओळख असते. ते केवळ पैशांच्या व्यवहाराशी निगडीत काम करत असल्याने त्यांना ‘मनी मॅन’ म्हणून ओळखले जाते. सुरुवात – १२ लाख करीयरच्या मध्यावर – २० ते ३० लाख शेवटच्या अनुभवी टप्प्यात – ५० लाखांहून अधिक

४. तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्र या क्षेत्रात अतिशय मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकते. या क्षेत्रातील प्रसिद्ध म्हणून ओळखले जाणारे विभाग म्हणजे भूगर्भशास्त्रज्ञ, मरीन इंजिनिअर्स आदी. अनुभवी – २० ते २५ लाख

५. बिझनेस अॅनालिस्ट भारतात उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा सुरु असताना बिझनेस अॅनालिस्ट अतिशय महत्त्वाची भुमिका निभावतात. या पोस्टसाठी कंपन्यांना बोद्धिक कौशल्य आणि तर्कशास्त्रात हुशार असणारी व्यक्ती गरजेची असते. हे लोक गणित आणि तांत्रिक गोष्टींमध्येही हुशार असणे आवश्यक असते. साधारण उत्पन्न – सुरुवातीलाच ६ लाखांहून अधिक उत्पन्न